उत्तर भारतात हुडहुडी, महाराष्ट्राचा पारा घसरणार

मुंबई : उत्तर भारतात थंडी़ची लाट आलीय. त्यामुळं येत्या काही दिवसांत महाराष्ट्रामध्येही तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी घसरणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये आधीच तापमान शून्याच्या खाली पोहोचलंय. शिमल्यामध्ये तर काल उणे दोन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. गुजरात राज्यांमध्ये तापमानात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात परभणी, हिंगोली, वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. हिंगोली जिल्ह्यातील तापमानात प्रचंड घट झाली आहे. परिणामी जिल्हाभरात थंडीची लाट पसरली आहे. . परभणी जिल्ह्यातील तापमान 10 अंशापर्यंत खाली आहे. त्यामुळे नागरिक ठिकठिकाणी शेकोटी पेटवून उब घेताना दिसत आहेत. वाशिममध्येही गेल्या काही आठवड्यापासून गायब झालेल्या थंडीने परत जोर धरला आहे. वाशिम जिल्ह्यात 14℃ पर्यंत पारा खाली घसरला आहे.
Comments
Add Comment

नेमक्या कोणत्या कारणामुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या ?

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या तब्बल ४० एकर जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर

पुणेकरांनो नव्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाच्या ४,१८६ घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली

पुणे : पुणे महानगर प्रदेशात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने (MHADA) मोठा दिलासा दिला आहे. विविध

मालेगावच्या बालिकेवर अत्याचार, सर्वत्र संताप; अभिनेत्री सुरभी भावेकडून कठोर शिक्षेची मागणी

मालेगाव : मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेल्या निर्घृण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन

राज्यभरातील व्यापाऱ्यांचा ५ डिसेंबरला लाक्षणिक बंद

पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरातील व्यापारी विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी

धक्कादायक प्रकार, पुण्यात १६ जेष्ठ नागरिकांना उघड्यावर टाकले

पुणे : पुण्यातील सामाजिक सुरक्षेच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. शहरातील १६

ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत घोटाळा! सर्वसामान्यांच्या बचतीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला फायदा

अकोला: अकोल्यातली ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक