‘त्या’ आमदाराची हकालपट्टी करा

  41


नीलेश राणेंचे अजित पवारांना आव्हान




मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांच्याकडून मोठी चूक झाली. त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नवघरे हे टीकेच्या रडारवर आले आहेत. याबाबत आता माजी खासदार, महाराष्ट्र भाजपचे सचिव नीलेश राणे यांनी नवघरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी तोफ डागली आहे.


https://twitter.com/meNeeleshNRane/status/1448515140039495680


‘राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांना भर चौकात फटके मारले पाहिजेत. राष्ट्रवादीवाल्यांची जिरवल्या शिवाय पर्याय नाही. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिंमत असेल तर ‘याची’ पक्षातून हकालपट्टी करा. औरंगजेबच्या औलादी आहेत या पक्षात,’ अशी टीका नीलेश राणे यांनी केली आहे.आमदार नीतेश राणे यांनीही नवघरे यांचा तो फोटो ट्वीट करून राष्ट्रवादीवर शरसंधान साधले आहे. ‘याला सत्तेचा माज म्हणतात. हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत,'’असे त्यांनी म्हटले आहे.


https://twitter.com/meNeeleshNRane/status/1448550370351861763

Comments
Add Comment

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व