Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमहावितरणच्या धाडीत तीन महिन्यात १०६ चोरीच्या केसेस

महावितरणच्या धाडीत तीन महिन्यात १०६ चोरीच्या केसेस

१२ लाख रुपयांची होणार वसुली

मुरबाड (प्रतिनिधी) : मुरबाड ग्रामीण भागात काही ठिकाणी राजरोसपणे विद्युत तारांवर आकडे टाकून चोरीची लाईट वापरली जाते. याची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मुरबाड उपविभाग अंतर्गत एप्रिल, मे, जून२०२२ या तीन महिन्यांमध्ये मुरबाड तालुक्यात अंतर्गत एकूण १०६ ग्राहकांना वीज चोरी करताना पकडले असून पकडलेल्या वीज चोरी मध्ये ७५८०१ युनिट महावितरण कंपनीस प्राप्त झाले असून त्या मोबदल्यात १२लाख ३३हजार४८०/एवढी रक्कम महावितरण कंपनीला प्राप्त होणार आहे.

त्यामुळे वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली व चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच या तीन महिन्याच्या कालावधीत प्रामुख्याने चार गाव पुढील प्रमाणे कलमखांडे, खाटेघर, शिवले, माल्हेड या गावासह १०६ ग्राहकांवर चोरीच्या केसेस करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून १२लाख ३३हजार ४८०/ रुपये जमा करण्यात येणार आहे.

तसेच वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांनी वीज चोरीच्या बिलाचा भरणा केल्यास त्यांच्यावर विद्युत कायदा २००३ कलम १३५ अंतर्गत पोलीस स्टेशन मध्ये वीज चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मुरबाड महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विवेक सिंगलवार यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -