Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीड्रोनद्वारे लसीची वाहतूक

ड्रोनद्वारे लसीची वाहतूक

पालघर : सध्या संपूर्ण जगात वेगवेगळ्या क्षेत्रांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपली कामे जलद व सुलभरित्या पार पाडली जात आहेत. या शृंखलेमध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम व लांबच्या कार्यक्षेत्रात ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत आहे. सदर प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लू इन्फिनिटी इनोवेशन लॅब व आय आयएफएल फाऊंडेशनच्या मदतीने राबवण्यात येत आहे.

या उपक्रमामध्ये ड्रोनद्वारे लसवाहतुकीमुळे अतिदुर्गम भागात जलद गतीने लस पोचवता येईल, ज्यामुळे शितसाखळी अबाधीत राहील आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या वेळेची व मनुष्यबळाची बचत होईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील काळात ड्रोनद्वारे अत्यावश्यक औषधे पाठवणे, रक्त पाठवणे, प्रत्यारोपणासाठी अवयव एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत पाठवणे बिनाअडथळा व अत्यंत कमी वेळामध्ये सहज शक्य होईल.

सदर उपक्रम डॉ. प्रदीप व्यास, अतिरीक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य व डॉ. रामास्वामी आयुक्त सार्वजनिक आरोग्य तथा अभियान संचालक एन.एच.एम यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्याच्या आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांचा सहकार्याने राबवण्यात येत आहे. हा उपक्रम राबवताना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संचालक सार्वजनिक आरोग्य विभाग आणि उपसंचालक मुंबई मंडळ, ठाणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य उपयुक्त ठरले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -