Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीकेरळमध्ये दोन दिवसात दोन नेत्यांच्या हत्या

केरळमध्ये दोन दिवसात दोन नेत्यांच्या हत्या

भाजपा नेत्याच्या हत्येनंतर जिल्ह्यात खळबळ; कलम १४४ लागू

तिरुवनंतपुरम : केरळमधील अलप्पुझा जिल्ह्यात रविवारी एका भाजपा नेत्याची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या (SDPI) नेत्याची हत्या करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपा नेत्याची हत्या करण्यात आली. त्यांच्यावरही हल्ला करुन हत्या करण्यात आली होती. एकाच जिल्ह्यात दोन दिवसात दोन नेत्यांची हत्या झाल्याने खळबळ माजली असून तणावपूर्ण स्थिती आहे.

केरळच्या आलाप्पुझा येथे २४ तासात झालेल्या २ राजकीय हत्याकांडानंतर जमावबंदी लावण्यात आलीय. अवघ्या १२ तासात झालेल्या दोन हत्यांमुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. त्यामुळे कुठलीही अप्रिय घटना टाळण्यासाठी आलाप्पुझा येथे धारा १४४ लावण्याचे निर्देश देण्यात आले.

यासंदर्भातील माहितीनुसार एसडीपीआयचे कार्यकर्ते शान के. एस. शनिवारी १८ डिसेंबर रोजी रात्री आपल्या स्कूटरवरुन मन्नाचेरी येथील घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोर हे दुचाकीवरुन आले होते. हल्लेखोरांनी धारदार चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. जखमी झालेल्या शान यांना उपचारासाठी एर्नाकुलम येतील जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचारा दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

या हत्येला १२ तास उलटण्यापूर्वी आज, रविवारी सकाळी डाव्या पक्षाच्या लोकांनी भाजप ओबीसी मोर्चाचे नेते रणजीत श्रीनिवास यांची राहत्या घराबाहेर हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, भाजप नेते मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असता ८ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. चाकू हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पनाराई विजयन यांनी अलाप्पुझा येथे दोन राजकीय नेत्यांच्या हत्येप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. सरकार कुणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -