Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीदुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कडक

दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कडक

मुंबई महापालिकेची नवी नियमावली

मुंबई: मुंबईतील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम अधिक कडक केले आहेत.

सध्या मुंबईत ओमायक्रॉन आणि कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यातच ३१ डिसेंबरला मुंबईत गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून पालिका खबरदरी घेत असली तरी सध्याचे वाढते कोरोना रुग्णांचे आकडे भीतीदायक आहेत. यासाठी महापालिकेने परदेशातून आणि मुख्यतः दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.
ओमायक्रॉनचा पार्श्वभूमीवर अति जोखीम असलेल्या १२ देशांची नावे भारत सरकारच्या यादीत आहेत. त्यापैकी दुबई हे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. अनेक उड्डाणे येथून बदलली जातात. त्यामुळे दुबईहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडे विशेष लक्ष दिले जाणार असून कडक नियम पालिकेने जाहीर केले आहे.

काय आहेत नवीन नियम?

• दुबईहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांनी ७ दिवस होम क्वारंटाईन राहायचे आहे. मुंबई विमानतळावर उतरणारे मुंबई ऐवजी राज्यातील अन्य जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी त्यांच्या घरी जाण्यासाठी जिल्हाधिकारी प्रवासाची सोय करतील. त्यांना सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करण्यास मनाई असेल. दुबईहून येणाऱ्या प्रवाशांबाबत ज्या प्रवाशांची मुंबई विमानतळावरून इतर राज्यात अथवा महाराष्ट्रात इतर विमानतळावर जोडून फ्लाईट असल्यास विमानतळ अधिकाऱ्याला कळविण्याची जबाबदारी विमानतळ प्राधिकरणाची असेल. दुबईहून मुंबईला आलेल्या प्रवाशांमध्ये मुंबईतील रहिवासी असल्यास ७ दिवस पालिकेच्या वॉर्ड रूम नियमाप्रमाणे होम क्वारांटाईन राहावे लागणार आहे व सातव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. जर चाचणी निगेटीव्ह आल्यास पुढील ७ दिवस प्रवाशाने स्वतःचे निरीक्षण करायचे आहे. चाचणी पॉझिटीव्ह आल्यास आंतरराष्ट्रीय प्रवासी मार्गदर्शक सूचनेनुसार क्वारंटाईन केले जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -