Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेशाळा सुरू झाल्या तरी अध्ययनाच्या लिंक मोबाईलवरच!

शाळा सुरू झाल्या तरी अध्ययनाच्या लिंक मोबाईलवरच!

विद्यार्थी त्रस्त, तर पालक चिंताग्रस्त

नवी मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाने शहरी भागातील काही शाळांना काही वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शाळेची घंटा अकरा दिवसांपूर्वी वाजली, तरीही ऑनलाइन अभ्यासाच्या लिंक मात्र विद्यार्थ्यांना मोबाईलवरच येत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.

शाळा सुरू झाल्याने ऑनलाइन शिकवणीचा प्रश्न दूर होईल, अशी समजूत पालक वर्गाची होती; परंतु ऑनलाइन शिकवणी बंद केली असली तरी शिक्षक वर्ग विविध अध्ययनाच्या लिंक मोबाईलवर पाठवून विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास करण्यास भाग पाडत आहेत. यामुळे नवी मुंबईमधील विद्यार्थ्यांबरोबरच पालकवर्ग चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी सातत्याने मोबाईलचा वापर केल्याने आरोग्यावरही परिणाम होत आहे.

मोबाईल, संगणक व लॅपटॉपच्या सततच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या नेत्ररोगाचे परिणाम समोर आले आहेतच. तसेच हेडफोनच्या वापरामुळे कानांचे आजारही समोर आले होते. तसेच मुलांना स्थूलपणाच्या समस्येनेही घेरले होते. आर्थिक दुर्बल असणाऱ्या पालकांना मोबाईल खरेदीसाठी अनंत अडचणीचा सामना करावा लागला होता. या सर्व समस्या सर्वश्रुत असताना विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई मनपा क्षेत्रातील शाळा जर विद्यार्थ्यांना मोबाईलवर अभ्यास करण्यास प्रवृत्त करत असतील, तर असे करू नये. सर्व शाळांना सूचना दिल्या जातील. – जयदीप पवार,उपायुक्त, शिक्षण, मनपा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -