Friday, April 26, 2024
Homeअध्यात्मसाई चालिसा

साई चालिसा

विलास खानोलकर

अमरपौरस पुसे उजाला आई
का गातात गोडवे शिर्डी साई ।। १।।
माता सांगे कथा साई
दत्तावतार होते साई ।। २।।
शिर्डीवर नजर प्रेमळ साई
साधा संत होता साई ।। ३।।
बडेजाव नव्हता साई
येणाऱ्याला प्रसाद देई साई ।। ४।।
जाणाऱ्याला आशीर्वाद देई साई
हातावर प्रेमभरे उदी देई साई ।। ५।।
अल्ला तेरा भला करेगा
अलख निरंजन तुझे संभालेगा ।। ६।।
ठेवा प्रेम श्रद्धा सबुरी
करू नको कोणाची बुरी ।। ७।।
साई पांघरे फाटके कांबळे
लटकत्या फळीवर निद्रा बळे ।। ८।।
कधी अंगात पांढरी कफनी
तर कधी भगवी कफनी ।। ९।।
कधी डोईस पांढरे मुंडासे
कधी डोईस भगवे मुंडासे ।। १०।।
साधी खाली पांढरी लुंगी
कधी पंचा धोतर अंगी
।। ११।।
ढोंगीपणा नव्हता अंगी
सर्वांच्या कल्याणा सदा दंगी ।। १२।।
हातात चिमटा कधी सटका
खांद्याशी झोळी निटनेटका ।। १३।।
दशगृही भिक्षा मागूनी आणी
गरिबासाठी दाणा पाणी ।। १४।।
अग्निवर हाताने रटरट ढवळी
आश्चर्याने जनता ढवळी पवळी ।।१५।।
दसऱ्याला गोडधोड गावजेवण
दिवाळीला गरिबा भंडारा जेवण ।। १६।।
ईदला हवेतर पुलाव जेवण
गणपतीला सर्वा मोदक जेवण ।। १७।।
रामनवमीला वरण-भात जेवण
पाडव्याला केशरी भाताचे जेवण ।।१८।।
साई म्हणे गरीबा द्या आधी जेवण
पशु प्राणी पक्षी द्या जेवण ।। १९।।
प्रेमळ ती साईची साधी राहणी
जीवन सारे भक्तांच्या कल्याणी ।। २०।।

माझ्यासाठी प्रजाच राजाराणी
वेळप्रसंगी वाटतो मी छोटी नाणी ।। २१।।
भक्त गाती सोमवारी शंकराची गाणी
मंगळवारी सारी गणपतीची गाणी ।। २२।।
गुरुवारची खास दत्तप्रभूची गाणी
शुक्रवारी लक्ष्मी देवीची गाणी ।। २३।।
हनुमान प्रसन्नची शनिवारी गाणी
भक्त गाते रविवारी भजन गाणी ।। २४।।
साई दरबारी साईचाच प्रकाश
शिर्डीत साईचा सूर्य प्रकाश ।। २५।।
तबला पेटी झांज चिपळ्या
कंदील सुरनळ्या भुईनळ्या ।। २६।।
गणू दास गाती साई महिमा
कार्तिकी आषाढी विठ्ठल महिमा ।। २७।।
शामा घेऊनी हाती एकतारी
भजन ऐकता खूश स्वारी ।। २८।।
प्रेमळ पुत्र वदे आई आई
मी गाईन गाणी साई-साई
।। २९।।
चांद पाटलाची हरवली घोडी
साईकृपेने मिळाली जंगलात घोडी ।। ३०।।
हाती साई देई चिलीम पाणी
सटक्याने ज्वलंत अग्नी पाणी ।। ३१।।
चांद पाटलासोबत आली स्वारी
शिर्डी बाहेर खंडोबा द्वारी
।। ३२।।
म्हाळसापती बोले आवो साई
तीनदशके राहून गावाचाच साई ।। ३३।।
गणुदास शामा निम्होणकर भक्त
बाईजाबाई देई जेवण पुत्रवक्त ।। ३४।।
देशपांडे, बुट्टी खरा भक्त
साईसाठी बांधे राजवाडा भक्त ।। ३५।।
वाड्यातच राहीन साईचा निवाडा
साईदरबार साईसमाधी बुट्टीवाडा ।। ३६।।
दसऱ्या दिवशी पालखी स्वर्गादिशी
प्राणज्योत निमाली पवित्र दिवशी ।। ३७।।
देवसारे जमा झाले आकाशी
फुले बरसती ताऱ्यांची नक्षी ।। ३८।।
साईरूपी शिर्डी महाराष्ट्र
श्रद्धा सबुरी ठेवेल राष्ट्र ।। ३९।।
अमृतधारा गातो साई दिलासा
साईचालिसा गातो भक्त विलासा ।। ४०।।

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -