Friday, April 26, 2024
Homeमहत्वाची बातमीJode Maro : राहुल गांधींविरोधात राज्यात जोडे मारा आंदोलन

Jode Maro : राहुल गांधींविरोधात राज्यात जोडे मारा आंदोलन

राहुल गांधींविरोधात भाजप, मनसे, शिंदे गट आक्रमक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचे तीव्र पडसाद

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरून बाळासाहेबांची शिवसेना तसेच भाजप आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी त्यांनी (Jode Maro) आंदोलने केली. (jode maro movement in the state against Rahul Gandhi) काही ठिकाणी राहुल गांधींविरुद्ध जोडे मारा आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आता आंदोलन करणार आहे. सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनीही शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात तक्रार केली असून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.नाशिकमध्येही राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजयुमोचे आंदोलन… केले. ठाणे आणि डोंबिवली येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेने जोडे मारा आंदोलन केले.

डोंबिवलीत बाळासाहेबांची शिवसेनेचे जोडो मारो आंदोलन

भारत जोडो अभियान अंतर्गत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे उद्गार काढले ते अतिशय चुकीचे आणि निषेधार्ह आहेत. बाळासाहेबांची शिवसेना असे वक्तव्य कधीही खपवू घेणार नाही. आता आम्ही फक्त राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारले आणि निषेध केला यानंतर असे उद्गार काढले, तर आम्ही उग्र आंदोलन करू, असे वक्तव्य बाळासाहेबांची शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी डोंबिवलीत केले. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमानंतर झालेल्या जोडो मारो आंदोलन प्रसंगी मोरे बोलत होते.

बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे प्रथम स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल निषेध मोर्चा काढला. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी निषेध नोंदविला. राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देऊन गांधी यांच्या फोटोला कोल्हापुरी जोडे मारले. राहुल गांधी हाय-हाय, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो…! अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर दणाणून गेला होता.

ठाण्यात आंदोलन

राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ टेंभीनाका येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे त्यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन करण्यात आले.

राहुल गांधी यांनी स्वतःच्या आजीचे पत्र वाचलेले नाही : अॅड. आशीष शेलार

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी लिहिलेल्या एका पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांनी भारताचा सुपुत्र म्हटले असून त्यांचा उल्लेख वीर सावरकर असा केला आहे. तसेच सावरकर यांनी ब्रिटिशांविरोधात अतिशय धाडसी युद्ध केले, त्याची नोंद इतिहासात होईल. असे नमूद केले आहे. राहुल गांधी यांनी स्वतःच्या आजीचे पत्र वाचलेले नाही. त्यामुळे त्यांचे विधान हे बेअक्कलपणाचे आहे. म्हणून त्याचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया अॅड आशीष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

अवमान प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्याविरोधात दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वा. सावरकर यांचे नातू आणि स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी गुरुवारी दुपारी लेखी तक्रार केली. यावेळी पोलीस ठाण्यात त्यांच्यासह खासदार राहुल शेवाळे देखील उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -