Friday, April 26, 2024
HomeदेशISROच्या मिशन 'चांद्रयान ३' ला मोठे यश, डिबूस्टिंगचा पहिला टप्पा यशस्वी

ISROच्या मिशन ‘चांद्रयान ३’ ला मोठे यश, डिबूस्टिंगचा पहिला टप्पा यशस्वी

मुंबई: चांद्रयान ३ने (chandrayaan 3) आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला. यासोबतच हे यान चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले आहे. चांद्रयान ३च्या लँडर मॉड्यूलची (lander module) डिबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे आता हे यान चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले आहे. चांद्रयान ३च्या लँडर मॉड्यूलची स्थिती सामान्य आहे.

विक्रम लँडर यशस्वीपणे वेगळे झाले

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने गुरूवारी दुपारी मुख्य अंतराळ यान चांद्रयान ३ पासून विक्रम लँडर हे यशस्वीपणे वेगळे झाले आहे. यासोबतच भारताच्या या चांद्रयान मिशनने यशाचा आणखी एक टप्पा पार केला आहे. चांद्रयान ३ अंतराळ यानाच एक प्रोप्लशन मॉड्यूल (वजन २१४८ किग्रॅ), एक लँडर( 1723.89 किग्रॅ) आणि एक रोव्हर(२६ किग्रॅ) यांचा समावेश आहे.

 

याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने ट्वीट केले, प्रवासासाठी धन्यवाद मित्रा! लँडर मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीपणे वेगळे करण्यात आले आहे. उद्या साधारण ४ वाजता नियोजित डिबूस्टिंगवर एलएम थोड्या खालच्या कक्षेत उतरण्यास तयार आहे.

 

२३ ऑगस्टला सॉफ्ट लँडिंग


इस्रोच्या माहितीनुसार लँडर चंद्रमाच्या चारही दिशांनी १५३x१६३ किमीच्या कक्षेत प्रोपल्शन मॉड्यूलपेक्षा वेगळे झाले आहे. हे प्रोपल्शन मॉड्यूल सध्याच्या कक्षेत अनेक महिने अथवा वर्षांपर्यंत आपला हा प्रवास कायम राखणार आहे. इस्रोचे म्हणणे आहे की २३ ऑगस्टला हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय क्षेत्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. याआधी बुधवारी चांद्रयान ३ चंद्राच्या अधिक जवळ पोहोचले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -