Saturday, April 27, 2024
Homeताज्या घडामोडीरेल्वे बोर्ड भरतीबाबत महत्त्वाची सूचना

रेल्वे बोर्ड भरतीबाबत महत्त्वाची सूचना

मुंबई : रेल्वे बोर्ड भरतीबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाची सूचना दिली आहे. सीइएन क्र. आरआरसी-०१/२०१९च्या (CEN No.RRC-01/2019) स्तर- १ पोस्टच्या संदर्भात छायाचित्रे आणि/किंवा स्वाक्षरी आणि अर्जाची स्थिती तपासण्यासाठी दुव्यात बदल करण्याबाबत ही सूचना आहे.

२६.११.२०२१ च्या मागील सूचनेच्या संदर्भात, फोटो आणि/किंवा स्वाक्षरी नव्याने अपलोड करण्यासाठी १५ डिसेंबर २०२१पासून आरआरबीच्या सर्व अधिकृत संकेतस्थळांवर फेरफार लिंक लाइव्ह होणार आहे. अवैध छायाचित्र आणि/किंवा स्वाक्षरीच्या आधारावर ज्यांचे अर्ज नाकारले गेले आहेत, अशा उमेदवारांनाच एकदा संधी आहे. सर्व उमेदवार त्यांचा अर्ज नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख भरून त्यांची अर्जाची स्थिती (स्वीकारलेले/नाकारलेले) तपासू शकतात.

सीइएन क्र. आरआरसी-०१/२०१९मध्ये (आरआरबीच्या वेबसाइटवर उपलब्ध) नमूद केलेल्या तपशीलानुसार उमेदवारांना त्यांचे स्कॅन केलेले छायाचित्र आणि स्वाक्षरी तयार ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ज्या उमेदवारांचे अर्ज आधीच स्वीकारले गेले आहेत त्यांनी या लिंकद्वारे पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले आहे. बेकायदेशीर मोबदल्यात नोकरीसाठी निवडून देण्याचे खोटे आश्वासन देऊन दिशाभूल करणाऱ्या दलालांपासून सावध राहा, असेही कळवण्यात आले आहे.

आरआरबी/आरआरसी परीक्षांमधील भरती प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत आहे आणि निवड पूर्णपणे उमेदवारांच्या गुणवत्तेवर आधारित आहे. उमेदवारांनी या भरतीच्या प्रगतीबाबत नियतकालिक अद्यतनांसाठी फक्त आरआरबी/आरआरसीच्या अधिकृत वेबसाइट्सचा संदर्भ घ्यावा आणि मीडिया/सोशल मीडियात येणाऱ्या अनधिकृत बातम्या/पोस्ट्समुळे दिशाभूल करून घेऊ नये.
पुढील अपडेट्ससाठी आरआरबीचे अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहत राहावे, असे सांगण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -