Saturday, April 27, 2024
Homeमहत्वाची बातमीदारू पिऊन एसटी चालवल्यास चालकासह आगारप्रमुखही दोषी

दारू पिऊन एसटी चालवल्यास चालकासह आगारप्रमुखही दोषी

पेण (वार्ताहर) : राज्यातील ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या दुर्घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने कायदा अधिक कठोर केला आहे. त्यानुसार, दारू पिऊन गाडी चालवल्यास तुम्हाला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. असाच एक कायदा एसटी महामंडळाने देखील केला आहे. अपघात टाळण्यासाठी एसटी बस चालकाने मद्यप्राशन केले नाही, याची खात्री केल्यानंतरच बस त्याच्या ताब्यात द्यावी, असे थेट आदेश एसटीच्या वाहतूक विभाग महाव्यवस्थापकांनी आगार प्रमुखांना दिले आहेत. यापुढे दारू पिऊन एसटी चालकांनी बस चालवली तर आगरप्रमुखांना देखील दोषी धरले जाणार आहे.

कोरोना काळात तसेच त्या नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हा आर्थिक तोटा भरुन काढण्यासाठी विविध उपाय योजना सुरू आहेत. त्यानुसार अपघात रोखण्यासाठी देखील महामंडळाने कडक धोरण अवलंबिले आहे. चालकाने बस ताब्यात घेण्याआधी त्याने मद्य प्राशन केले आहे का ? याची जबाबदारी आगारप्रमुख यांची असणार आहे. यापुढे चालकाची तपासणी केल्याशिवाय बस ताब्यात दिली जाणार नाही. तपासणीची स्वतंत्र नोंद… बस त्याब्यात देण्या आधी चालकाने मद्यप्राशन केले की नाही याची तपासणी आगार प्रमुखांनी करण्याचे आदेशच महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. त्यानुसार चालकांची होणाऱ्या तपासणीसाठी स्वतंत्र रजिस्टर मध्ये नोंद ठेवली जाणार आहे.

सर्व आगारप्रमुखांना महाव्यस्थापकांचे पत्र

अपघात टाळण्यासाठी एसटी बस चालकाने मद्यप्राशन केले नाही, याची खात्री केल्यानंतरच बस त्याच्या ताब्यात द्यावी, असे आदेश एसटीच्या वाहतूक विभाग महाव्यवस्थापकांनी आगार प्रमुखांना दिले आहेत. त्याअनुषंगाने लेखी पत्रच राज्यांतील सर्व आगरप्रमुखांना देण्यात आले आहे. यापुढे दारू पिऊन एसटी चालकांनी बस चालवली तर आगरप्रमुखांना देखील दोषी धरले जाणार असून कठोर कारवाई ही केली जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -