सातारा : साता-यातील कोयना धरण परिसरात सकाळी साडेसहाच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या हेळबाग परिसरात असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या भूकंपाचे धक्के २.८ रिश्टर स्केल एवढे होते. या घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील गावांतही भूकंपाचे धक्के जाणवले होते.