Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाजोकोविचचा व्हिसा रद्द

जोकोविचचा व्हिसा रद्द

आवश्यक कागदपत्र नसल्याने ऑस्ट्रेलिया सरकारची कारवाई

मेलबर्न (वृत्तसंस्था):ऑस्ट्रेलिया सरकारने जगातील नंबर वन टेनिसपटू सर्बियाचा नोवाक जोकोविचचा व्हिसा रद्द केला आहे. प्रवेशाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. नियम हा नियम असतो. विशेषतः जेव्हा आपल्या सीमेचा प्रश्न येतो. तेव्हा कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कोणीही कायद्याच्या वरचढ नाही. कोरोनामुळे जगातील सर्वात कमी मृत्यूदर येथे आहे. आम्ही सतत सतर्क आहोत.असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मान्यता दिली होती, त्याला लसीकरण नियमांमध्ये सूट दिली होती.

कोरोना काळात ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. १७ जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. २० ग्रँडस्लॅम जिंकणारा जोकोविच बुधवारी मेलबर्नला पोहोचला, पण त्याला विमानतळाबाहेर जाऊ दिले नाही. त्याला एक तास विमानतळावर थांबवण्यात आले, त्यानंतर प्रवेशाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला. जोकोविच हा वैद्यकीय सवलत मिळविण्यात इतका गुंतला होता, की त्याने त्याच्या व्हिसाकडे पूर्ण लक्ष दिले नाही आणि त्यामुळेच त्याला मेलबर्न विमानतळावर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जोकोविचकडे लसीकरण प्रमाणपत्र नव्हते आणि तो त्याशिवाय स्पर्धा खेळू इच्छित होता.

दुसरीकडे, मी जोकोविचशी फोनवर बोललो आहे आणि संपूर्ण सर्बिया त्याच्यासोबत आहे. आमचे अधिकारी जोकोविचची समस्या सोडवण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहेत. सर्बिया आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत जोकोविच, न्याय आणि सत्यासाठी लढा देईल, असे सर्बियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर वुसिक यांनी इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -