Saturday, April 27, 2024
Homeमहत्वाची बातमीमिलिंद पळसुले यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार

मिलिंद पळसुले यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद दिवाकर पळसुले यांना भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार प्राप्त झाला असून नुकताच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पळसुले यांनी दोन वर्षांच्या कोरोना काळात आपल्या पदाला साजेसे असे चांगले काम करून भिवंडी शहरातील सर्व प्रभाग समितीमधील तसेच इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय व शहरातील अनेक कोव्हिड सेंटरमध्ये पालिकेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली व त्या संधीचा त्यांनी दुरुपयोग न करता चांगल्या प्रमाणात सर्व डॉक्टर, परिचारिका व अधिकारी आयुक्त, उपायुक्त, महापौर, उपमहापौर व सर्व नगरसेवक यांच्यासोबत राहून चांगले काम केले. त्यामुळे त्यांचा महानगरपालिकेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला होता, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन ओडिसा भुवनेश्वरच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून भारत सेवा रत्न गोल्ड मेडल पुरस्कार डॉ. मनीलाल शिंपी, डायरेक्टर तथा महाराष्ट्र राज्याचे राजदूत म. गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन ओडिसा भुवनेश्वर, डॉ. किशोर पाटील, संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व कोकण विभाग सरचिटणीस, भिवंडी पंचायत समितीचे उप सभापती एकनाथ पाटील, गटविकास अधिकारी अविनाश मोहिते, तालुका वैद्यकीय अधिकारी माधव वाघमारे, भिवंडी पत्रकार संघाच्या अध्यक्षा कुसुमताई देशमुख, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी आरएसपी अधिकारी जितेंद्र सोनवणे, आरएसपी अधिकारी शरद बोरसे, तसेच ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ कुंभार, शरद भसाले, संजय भोईर, संतोष चव्हाण, राजेंद्र काबाडी, आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -