Friday, May 3, 2024
Homeताज्या घडामोडीChhagan Bhujbal : लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघातून छगन भुजबळ यांची माघार

Chhagan Bhujbal : लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघातून छगन भुजबळ यांची माघार

पत्रकार परिषद घेत स्पष्ट केली भूमिका

नाशिक : लोकसभा निवडणुकीचा आज पहिला टप्पा पार पडत असला तरी महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघाचा (Nashik Lok Sabha Constituency) तिढा सुटलेला नाही. नाशिकमध्ये अधिक प्रभाव असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पहिल्यापासून या जागेसाठी आग्रही होते. मात्र, त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) देखील नाशिकची जागा लढवण्यासाठी इच्छुक होते. यावर गेले कित्येक दिवस तोडगा निघत नव्हता. अखेर आज पत्रकार परिषद घेत आपण नाशिकच्या उमेदवारीतून माघार घेत आहोत, असं छगन भुजबळ यांनी जाहीर केलं. महायुती वाढवण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करु, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत. काही ठिकाणी महायुतीत जागा कुणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे. नाशिकच्या बाबत होळीच्या दिवशी आम्हाला अजित पवार यांचा निरोप आला होता. तिथे प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे होते. आज आम्ही ६ वाजता दिल्लीवरून आलो आणि त्या ठिकाणी अमित शाह यांच्यासोबत आम्ही चर्चा केली तिथे जागा वाटप बाबत चर्चा झाली, असं ते मला म्हणाले. छगन भुजबळ यांना उभे करा असे थेट अमित शाह यांनी सांगितलं.

त्यावेळी एकनाथ शिंदे, अमित शाह यांना म्हणाले की तिथे हेमंत गोडसे आमचे उमेदवार आहेत. परंतु अमित शाह म्हणाले आम्ही त्यांना समजावू. आम्ही मतदारसंघात जाऊन आढावा घेतला. आम्हाला वातावरण चांगलं असल्याचं लक्षात आलं. अल्पसंख्याक ओबीसी आमच्या बाजूने असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर बातमी फुटली आणि माझ्या उमेदवारी बाबत माध्यमातून बातमी बाहेर आली. हे सुरू झाल्यानंतर मी बातमी खरी आहे का हे चेक करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला ते म्हणाले अमित शाह यांनी तुम्हाला लढावं लागेल असे सांगितलं. चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा सेम बोलले. त्यानंतर ३ आठवडे गेले मात्र अजुनही उमेदवार जाहीर झालेले नाहीत, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

मी या निवडणुकीतून माघार घेतली

छगन भुजबळ म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी मागील ३ आठवड्यांपासून फिरत आहे. त्यांचा प्रचार देखील पुढे गेला आहे. जेवढा निर्णय घ्यायला वेळ लागेल तेवढ्या अडचणी वाढणार आहेत. सध्या जो काही संभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी मी प्रेस घेतली. मी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मी राज्यभरात प्रचाराला सुरूवात केली आहे. मी आता महायुतीची शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मला आत्तापर्यंत ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचा आभारी आहे. मोदी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे आभार, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -