Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीArnold Dix : 'त्या' ४१ मजुरांचे प्राण वाचवणारे पहिल्यांदा कुठे गेले?

Arnold Dix : ‘त्या’ ४१ मजुरांचे प्राण वाचवणारे पहिल्यांदा कुठे गेले?

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांची भावनिक प्रतिक्रिया

उत्तरकाशी : उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात काल १७ व्या दिवशी रेस्क्यू टीमला मोठे यश मिळाले. तब्बल ४०० तासांनंतर मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कामगारांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर सव्वा नऊच्या सुमारास सर्व ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सर्वप्रथम मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बोगद्यातून बाहेर आलेल्या सर्व मजुरांचे पुष्पहार घालून स्वागत केले. वैद्यकीय तपासणीनंतर सर्व कामगारांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून सर्व कामगार निरोगी आहेत.

या सर्व रेस्क्यू ऑपरेशनमध्ये या १७ दिवसात अनेक अडचणी आल्या. मात्र त्यावर मात करत रेस्क्यू टिमने आपले काम सुरु ठेवले. अखेर त्यांना यश मिळाले. आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स (Arnold Dix) म्हणतात, “१७ दिवस शर्थीचे प्रयत्न सुरु होते. अनेक अडचणी आल्या. आम्ही सर्वांनी आपापल्या देवाचा धावा केला होता. अप्रत्यक्षपणे देवाने आम्हाला साथ दिली. या ऑपरेशनमध्ये सेवा करणे हे माझ्यासाठी अभिमानस्पद आहे. तसेच एक पालक म्हणून काम केले. व एक पालक म्हणून सर्व मुलांना त्यांच्या घरी पोहचवण्यास मदत करणे, हे माझ्यासाठी अभिमानस्पद आहे.”

अरनॉल्ड डिक्स पुढे म्हणाले, “सुरुवातीला मी सांगितले होते की, ४१ लोक घरी येणार आहेत. ख्रिसमसला सर्व घरी असतील, कुणालाही दुखापत होणार नाही. आता ख्रिसमस लवकर येत आहे आणि मजूर त्यांच्या घरी असतील. आम्ही शांत होतो आणि आम्हाला नेमके काय हवे आहे हे आम्हाला माहित होते. आम्ही एक अप्रतिम टीम म्हणून एकत्र काम केले. भारताकडे सर्वोत्कृष्ट अभियंते आहेत. या यशस्वी मोहिमेचा एक भाग झाल्याचा मला खूप आनंद आहे.”

“रेस्क्यू मोहिम संपल्यावर पहिल्यांदा मी काल परत चर्चमध्ये गेलो. कारण जे घडले त्याबद्दल मी माझ्या देवाचे आभार मानण्याचे वचन दिले होते. जर तुमच्या लक्षात आले असेल, तर आपण नुकताच एक चमत्कार पाहिला,” असे अरनॉल्ड डिक्स म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -