Saturday, May 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजठाकरे गटाला झटका: माजी महापौर दत्ता दळवींना अटक, भरसभेत मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरणे...

ठाकरे गटाला झटका: माजी महापौर दत्ता दळवींना अटक, भरसभेत मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरणे भोवले

मुंबई : भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना अपशब्द वापरणे माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना चांगलेच भोवले आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांना आज सकाळी अटक करण्यात आली. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

भांडूप पोलीस स्टेशनबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहेत. कार्यकर्त्यांची पोलीस स्टेशनबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत पोलीस ठाण्यात पोहचले आहेत. दत्ता दळवींना अटक का केली? असा जाब पोलिसांना राऊत विचारणार आहेत. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी चर्चा करतील.

भांडूपमध्ये रविवारी (दिनांक २६ नोव्हेंबर) ठाकरे गटाचा कोकणवासीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात माजी महापौर व ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आपत्तीजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे आज सकाळी आठ वाजता भांडुप पोलिसांनी त्यांना विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात भा.द.वी कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -