Sunday, May 5, 2024
Homeक्रीडाSehwag-Gambhir: अहंकार आणि सत्तेच्या हव्यासापोटी...सेहवागने गंभीरवर साधला निशाणा

Sehwag-Gambhir: अहंकार आणि सत्तेच्या हव्यासापोटी…सेहवागने गंभीरवर साधला निशाणा

मुंबई: भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (gautam gambhir) सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) कॉमेंट्री करत आहे. यात भारत-नेपाळ सामन्यादरम्यानचा गंभीरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यात तो प्रेक्षकांना मधले बोट दाखवताना दिसला होता.

गंभीरने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की प्रेक्षकांमध्ये काही पाकिस्तानीही होते जे भारताविरुद्ध घोषणा देत होते आणि काश्मीर मुद्दा उचलत होते. त्यांच्यासाठी गंभीरने हा इशारा केला होता. गौतम गंभीर पूर्व दिल्लीतून भाजपचे खासदार आहेत.

मला राजकारणात रस नाही

आता या पूर्ण प्रकरणात भाराचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागची एंट्री झाली आहे. त्याने सरळपणे या मुद्द्याला हात घातला नाही तसेच गंभीरचे नाव घेतलेले नाही. मात्र नाव न घेता सेहवागने गंभीरशी पंगा घेतला आहे. सेहवागने मंगळवारी सांगितले की खेळाडूंनी राजकारणात खरं तर येऊ नये आणि जे राजकारणात उतरतात ते केवळ अहंकार आणि सत्तेच्या हव्यासापोटी असे करतात.

 

सेहवागने आपल्या चाहत्याला उत्तर देताना केले हे विधान

वीरू म्हणाला, लोकांसाठी खरतंर मुश्किलीने वेळ काढू शकतो. यात काही अपवाद असू शकतात मात्र बरेचजण पीआरसाठी असे करतात. मला क्रिकेटशी जोडलेले रहायला आवडते तसेच कमेंट्री करणे चांगले वाटते. मला खासदार होण्याची कोणतीही इच्छा नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -