Sunday, May 5, 2024
HomeकोकणरायगडVadakhal Gram Panchayat : राष्ट्रवादीच्या उपसरपंचासह ८ सदस्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

Vadakhal Gram Panchayat : राष्ट्रवादीच्या उपसरपंचासह ८ सदस्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

वडखळमध्ये राष्ट्रवादी पक्षाला खिंडार

अलिबाग (वार्ताहर) : पेण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वडखळ ग्रामपंचायतीमधील (Vadakhal Gram Panchayat) राष्ट्रवादीच्या उपसरपंचासह ८ सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप आमदार रवीशेठ पाटील आणि वैकुंठ पाटील यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती हा प्रवेश झाला.

एक सरपंच व १५ असे सोळा सदस्य असलेल्या वडखळ ग्रामपंचायतीमध्ये आता चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी पक्षात असलेल्या विद्यमान उपसरपंच योगिता मोकल, सदस्य रवींद्र म्हात्रे, विनोदिनी कोळी, सुरेखा म्हात्रे, योगेश पाटील, आशा म्हात्रे, संगीता भोईर, सुरेखा मोरेश्वर म्हात्रे, विवेक म्हात्रे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रवी मोकल, पंचक्रोशी एकविरा संस्थेच्या अध्यक्षा रूपा कोळी आदींसह अनेक मोठ्यासंख्येने कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाची शाल खांद्यावर घेऊन हा पक्षप्रवेश केला आहे. यामुळे वडखळ भागात भाजपची ताकद वाढली आहे.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप आमदार रवीशेठ पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, युवानेते वैकुंठ पाटील, श्रीकांत पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, तालुका अध्यक्ष योगेश पाटील आदींसह महिला वर्ग, भाजपमध्ये प्रवेश करणारे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वडखळ गावातील विद्यमान उपसरपंच, सदस्य व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षावर जो विश्वास दाखविला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही. ज्यांनी प्रवेश केला त्यांच्यासह सगळ्या कार्यकर्त्यांना सन्मानाची व आदराची वागणूक दिली जाईल व भविष्यात गावासाठी विविध समाजोपयोगी विकासाच्या योजना राबविल्या जातील, असे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले.

वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील विकास नजरेसमोर ठेवत आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे, तसेच ग्रामपंचायत व इतर निवडणुकीत भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी काम करून भारतीय जनता पार्टीचा सरपंचपदाचा उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करून भाजपचाच सरपंच वडखळ ग्रामपंचायतीवर बसवून भाजपचा झेंडा फडकविणार असल्याचे योगिता मोकल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -