Tuesday, May 7, 2024
Homeमहत्वाची बातमीशिवसेनेतून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काय कारनामे केले? नारायण राणे यांनी स्पष्टच सांगितलं

शिवसेनेतून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काय कारनामे केले? नारायण राणे यांनी स्पष्टच सांगितलं

‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मोठे गौप्यस्फोट

मुंबई: झी मराठी वाहिनीवरील बहुचर्चित ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनमध्ये केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची राजकीय मुलाखत विशेष रंगली. यावेळी नारायण राणेंनी अनेक गौप्यस्फोट केले. मला शिवसेनेतून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कुटुंबासह दोनदा घर सोडलं, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला.

नारायण राणे याआधीच्या सिझनमध्येही पत्नीसह सहभागी झाले होते. त्यावेळीही राणे यांनी गुप्तेंचा मंच गाजवला होता. यावेळी पहिला गौप्यस्फोट करताना ते म्हणाले, ‘ सध्या उबाठा गटाची जी परिस्थिती आहे ती त्यांनीच निर्माण केली आहे. आम्ही सगळे जायला तेच कारणीभूत आहेत. मी शिवसेनेत असतो तर त्यांची वाईट अवस्थाही झाली नसती. एक आमदार इकडचा तिकडे जाऊ शकत नव्हता. ४० तर सोडाच’ असं वक्यव्य नारायण राणे यांनी केलं.

बाळासाहेबांसाठी मी, ‘माझा शिवसैनिक’

‘बाळासाहेबांना जे वाटायचं राज्य कारभाराबद्दल ते मला चांगलं माहिती होतं. त्यामुळे त्यांना खात्री होती, की याला सांगायची गरज नाही, हा करणार. त्यांना एखादं पुस्तक मला द्यायचं असेल, तर ते लिहायचे, माझा शिवसैनिक नारायण राणे. नुसतं नारायण राणे म्हणून कधी पत्र लिहिलं नाही, माझा शिवसैनिक असायचंच’ अशी आठवणही राणेंनी सांगितली.

उद्धव ठाकरेंची ती धमकी

‘मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा घर सोडलं. हॉलिडे इनमध्ये कुटुंबासह राहायला गेले होते. मात्र दोन्ही वेळा बाळासाहेबांना तयार करुन मी जाऊन आणलं, ते साहेबांना एकच धमकी द्यायचे, घर सोडायची’ असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणेंनी केला.

राऊतांना खासदार मी केला…

संजय राऊत यांना खासदार मी केला, तेव्हा खासदार झाले नसते, तर पुढे कधीच झाले नसते, हे माझं पाप आहे, अशी संजय राऊत यांच्याबद्दल खंतही यावेळी नारायण राणे यांनी बोलून दाखवली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -