Sunday, April 28, 2024
Homeताज्या घडामोडीThackeray Vs Shinde: रुग्णवाहिकेच्या उद्घाटनाकडे ठाकरेंनी फिरवली पाठ; नाराज कार्यकर्ते थेट मुख्यमंत्र्यांच्या...

Thackeray Vs Shinde: रुग्णवाहिकेच्या उद्घाटनाकडे ठाकरेंनी फिरवली पाठ; नाराज कार्यकर्ते थेट मुख्यमंत्र्यांच्या शिवसेना पक्षात!

काल रात्री पार पडला पक्षप्रवेश

मुंबई : लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) जाहीर होण्याची वेळ आलेली असताना ठाकरे गटाला (Thackeray group) लागलेली गळती मात्र थांबायचे नाव घेत नाही. अनेक मोठमोठ्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आता स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते व पदाधिकारी देखील ठाकरे गटाची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करत आहेत. त्यातच आता पनवेलमधील (Panvel) काही कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रुग्णवाहिकेच्या उद्घाटन कार्यक्रमाकडे उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केल्यामुळे आलेल्या नाराजीतून त्यांनी थेट शिवसेना पक्षात प्रवेश केला. काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला.

काही दिवसांपूर्वी पनवेल येथील ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण करुन घ्यायचे होते. परंतु, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या कार्यक्रमासाठी वेळ देता आला नाही. ही गोष्ट या कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. याच नाराजीतून या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला जवळ करण्याचा निर्णय घेतला. या घटनेची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

ठाकरे गटाचे पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी १६ लाख खर्च करुन रुग्णसेवेसाठी अ‍ॅम्ब्युलन्स विकत घेतली होती. उद्धव ठाकरे पनवेलमध्ये आल्यावर त्यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करावे, असा त्यांचा बेत होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी काही कारणास्तव या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे प्रथमेश सोमण आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. अखेर या सगळ्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काल रात्री प्रथमेश सोमण आणि त्यांचे कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेले. याठिकाणी झालेल्या छोटेखानी सोहळ्यात या सगळ्यांनी अ‍ॅम्ब्युलन्स चालकासकट शिवसेनेत प्रवेश केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -