Friday, May 3, 2024
Homeदेशदेशात कोरोनाची तिसरी लाट

देशात कोरोनाची तिसरी लाट

७५ टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे असल्याची कोरोना टास्क फोर्सच्या प्रमुखांची कबुली

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट आली असून महानगरांमधील एकूण कोरोना प्रकरणांपैकी ७५ टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे आढळून येत आहेत. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख एन. के. अरोरा यांनी ही माहिती दिली आहे. भारतात स्पष्टपणे कोरोनाची तिसरी लाट आली आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवॅक्सिन लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असेही कोविड टास्क फोर्सचे प्रमुख अरोरा यांनी सांगितले.

नोव्हेंबर महिन्यात सर्वात प्रथम दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर वेगाने संसर्ग होणाऱ्या ओमायक्रॉनच्या रुग्णांमधील ७५ टक्के रुग्ण मुंबई, दिल्ली आणि कोलकाता अशा मोठ्या शहरांमधील असल्याचं डॉक्टर एन के अरोरा यांनी सांगितले.

भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यापैकी बहुतेक रुग्ण हे मोठ्या शहरांमधून येत आहेत. कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचे हे संकेत आहेत. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांपैकी ७५ टक्के रुग्ण आढळले आहेत, असे देशाच्या लस वॅक्सिन टास्क फोर्सच्या प्रमुखांनी सांगितले. देशात कोविड लसीकरण सुरू झाल्यापासून एन. के. अरोरा या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत.

“ज्या वेरियंटची जिनोम सिक्वेन्सिंग केली गेली, त्यानुसार, गेल्या आठवड्यात राष्ट्रीय स्तरावरील सर्व वेरियंटपैकी १२ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत. पण गेल्या आठवडाभरात हे प्रमाण २८ टक्क्यांवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत कोविड संसर्गाच्या इतर वेरियंटपेक्षा ओमायक्रॉनचे रुग्ण खूप वेगाने वाढत आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे हे रुग्ण आढळून येत आहेत आहे. महानगरांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झपाट्याने होत आहे. या महानगरांमध्ये ओमायक्रॉनची ७५ टक्के रुग्ण आहेत, असे नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे (NTAGI) प्रमुख डॉ. अरोरा म्हणाले.

भारतात ओमायक्रॉनच्या १७०० रुग्णांची अधिकृतपणे नोंद झाली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ५१० रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात स्पष्टपणे कोरोनाची तिसरी लाट आली आहे आणि संपूर्ण परिस्थिती पाहता, नवीन वेरियंटचे अधिक रुग्ण आहेत. ते ओमायक्रॉनचे आहेत. गेल्या ४-५ दिवसांत सापडलेले पुरावे देखील याकडे निर्देश करतत आहेत आणि कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढत होत आहे, असे अरोरा म्हणाले. डॉक्टर अरोरा राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे चेअरमनदेखील आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -