Thursday, May 2, 2024
Homeमहत्वाची बातमीकोरोनाचे २० हजार रुग्ण सापडतील, तेव्हा मुंबईत लॉकडाऊन

कोरोनाचे २० हजार रुग्ण सापडतील, तेव्हा मुंबईत लॉकडाऊन

नवी नियमावली जाहीर

१० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करणार

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची महत्त्वपूर्ण माहिती

मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये मुंबई पुन्हा एकदा राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत सापडत आहेत. यामध्ये ओमायक्रॉन बाधितांचे प्रमाणही लक्षणीय आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे साहजिकच लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मुंबई शहरात ज्यावेळी दिवसाला कोरोनाचे २० हजार रुग्ण सापडून लागतील, तेव्हा मुंबईत लॉकडाऊन लागेल, असे इक्लाबसिंह चहल यांनी म्हटले.

मुंबईत सध्या दिवसाला ८ हजार नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाचा वेग पाहता २० हजाराचा टप्पा आठवडाभरातही गाठला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोरोना निर्बंध कमालीचे कठोर करण्यात आले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईतील इमारतींबाबत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एखाद्या इमारतीत १० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास ती संपूर्ण इमारत सील केली जाईल. कोरोना रुग्ण सापडलेल्या मजल्यावर घरातून बाहेर येण्यास आणि जाण्यास मज्जाव असेल. ज्या मजल्यावर कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे, त्या मजल्याच्या वरील आणि खालील मजल्यावरील सर्व रहिवाशांना पाचव्या किंवा सातव्या दिवशी कोरोना चाचणी करावी लागणार असल्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

तर महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागणार?

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्रात तुर्तास लॉकडाऊनची गरज नसल्याचे म्हटले होते. मात्र, तशी वेळ आल्यास लॉकडाऊन लावण्याचे निकष कोणते असतील, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले होते. यापूर्वीचा अनुभव पाहता राज्यात जेव्हा दररोज कोरोना रुग्णांसाठी ८०० मेट्रिक टनची गरज लागेल, तेव्हा लॉकडाऊन लावायचा, हे ठरले आहे. पण ओमायक्रॉनच्या संसर्गाच वेग हा प्रचंड आहे. त्यामुळे ऑक्सिजन वापराची मर्यादेचे निकष ५०० मॅट्रिक टनापर्यंत खाली आणण्याविषयी विचार सुरु आहे. त्यामुळे भविष्यात दररोज ५०० मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू लागल्यास महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू होईल, अशी शक्यता राजेश टोपे यांनी वर्तविली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -