Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाTeam India Schedule 2024: आयपीएलआधी कसोटी मालिका खेळणार टीम इंडिया, नंतर टी-२०...

Team India Schedule 2024: आयपीएलआधी कसोटी मालिका खेळणार टीम इंडिया, नंतर टी-२० वर्ल्डकप, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: भारतीय संघ २०२४मध्ये इंग्लंडशिवाय श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांसोबत खेळणार आहे. दरम्यान, आतापर्यंत बीसीसीआयचे संपूर्ण वेळापत्रक समोर आलेले नाही. मात्र जूनपर्यंत टीम इंडिया कोणाकोणासोबत खेळणार हे ठरलेले आहे.

दरम्यान, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ३ जानेवारीपासून खेळत आहे. यानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध आपल्या भूमीवर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

काय आहे या वर्षीचे वेळापत्रक?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेची सुरूवात २५ जानेवारीासून होईल. तर ही मालिका ११ मार्चपर्यंत खेळवली जाणार आहे. या दरम्यान दोन्ही संघ ५ कसोटी सामने खेळतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट्स टेबलच्या हिशोबाने ही मालिका खूप महत्त्वाची आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेनंतर टी-२० सामन्यांचे सत्र सुरू होईल. या मालिकेनंतर आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे. आयपीएलनंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० वर्ल्डकप २०२४चे आयोजन होणार आहे.

या संघांविरुद्ध खेळणार टीम इंडिया

टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघ इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून याबाबतचे कोणतेही वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात भारताला श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत मालिका खेळायची आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -