Friday, May 3, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वShare Market index : निर्देशांक उच्चांकावर, सावधानता आवश्यक...

Share Market index : निर्देशांक उच्चांकावर, सावधानता आवश्यक…

  • गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण

टाटा ग्रुप मागील आठवड्यात ‘टाटा टेक्नॉलॉजीज’ हा आयपीओ घेऊन आला. टाटा ग्रुप हा जवळपास २० वर्षांनी आयपीओ घेऊन आला. त्यामुळे त्याच्या लिस्टिंगकडे लक्ष लागून राहिले होते. टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स मागील आठवड्यात स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाले. कंपनीचे शेअर्स बीएसईवर १४० टक्के प्रीमियमसह १२०० रुपयांपासून सुरू झाले आहेत. तर त्याच्या आयपीओची अंतिम किंमत ५०० रुपये होती. गुंतवणूकदारांनी प्रत्येक शेअरवर ७०० रुपये कमावले आहेत. टक्केवारीत पाहायचे झाल्यास टाटा टेकने लिस्ट झाल्यावर गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास अडीच पटीने वाढवले.

टाटा टेकचे शेअर्स लिस्ट झाल्यानंतर किंचित घसरले आहेत. ज्या लोकांना शेअर्स मिळाले आहेत त्यांनी त्यांचे शेअर्स प्रॉफिट बुकींगसाठी म्हणजेच नफा मिळविण्यासाठी विकले त्यामुळे नंतर यामध्ये घसरण पहावयास मिळाली. आता कंपनीचे बाजार भांडवल सुमारे ५३,००० कोटी रुपये आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने शुक्रवारी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करण्यात आला. त्यामध्ये गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी व्याजदरात कोणतेही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले. आरबीआय गव्हर्नर दास यांनी रेपो रेट  ६.५ टक्क्यांवर कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. दुसऱ्या तिमाहीमध्ये जीडीपी मध्ये अपेक्षेहून चांगली वाढ पाहत त्याच धर्तीवर सलग पाचव्यांदा रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. आरबीआयच्या या निर्णयामुळे आता रेपो रेटमध्ये कोणतेही बदल होणार नसल्यामुळे वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कर्जावर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

अल्पमुदतीसाठी निर्देशांकाची दिशा आणि गती तेजीची आहे. पुढील आठवड्यासाठी निर्देशांक निफ्टीची २१२०० ही अत्यंत महत्वाची विक्रीची पातळी आहे. निर्देशांक जोपर्यंत या पातळीच्या खाली आहेत तोपर्यंत निर्देशांकात मोठी तेजी येणार नाही. मध्यम मुदतीसाठी सेन्सेक्स निफ्टीची २०७०० ही महत्वाची खरेदीची पातळी असून यापुढील काळात जर ह्या पातळ्या तुटल्या तरच शेअर बाजारात घसरण होवू शकेल. सध्या निर्देशांकात फार मोठी वाढ अल्पावधीत पहावयास मिळालेली असल्याने निर्देशांक ‘नो ट्रेड झोन’ मध्ये आलेले आहेत. आता जोपर्यंत निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची दिशा स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ‘होल्ड कॅश इन हॅंड’ हेच धोरण अवलंबणे योग्य ठरेल. पूर्वी खरेदी केलेल्या शेअर्समध्ये स्टॉपलॉस पद्धतीचा वापर करणे योग्य ठरेल.

शेअर्स खरेदी – विक्री करीत असताना स्टॉपलॉसचा वापर करणे आवश्यक आहे. शुक्रवारी निफ्टी २०९६९ अंकांवर बंद झाली. सोने या धातूचा विचार करता ६१९०० ही अत्यंत महत्त्वाची विक्री पातळी असून जोपर्यंत सोने या पातळीच्या खाली आहे तोपर्यंत सोन्यात मोठी वाढ होणार नाही. कच्च्या तेलाचा विचार करता कच्चे तेल ५७०० ते ६१७० या पातळीत अडकलेला असून ज्यावेळी या पातळीतून कच्चे तेल बाहेर पडेल त्यानंतर कच्च्या तेलात वाढ किंवा घसरण होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -