Tuesday, August 25, 2026

Ganesh Murti Safety : कार्यशाळेतून निघणाऱ्या मोठ्या गणेशमूर्तींवर पोलिसांची नजर

Ganesh Murti Safety : कार्यशाळेतून निघणाऱ्या मोठ्या गणेशमूर्तींवर पोलिसांची नजर

फिटनेस स्ट्रॅबिलिटीनंतरच आगमन मिरवणुकीचा मार्ग करणार खुला

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत सध्या गणरायांच्या आगमनाची लगबग सुरु झाली असून अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती या कार्यशाळेतून मंडपात वाजत गाजत नेले जात आहेत. मात्र, भुलेश्वरचा राजाची मूर्ती आगमन मिरवणुकीत खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता कार्यशाळेत मूर्ती नेण्यापूर्वी मूर्ती तसेच मूर्ती नेण्यासाठी असलेल्या ट्रॉलीची स्टॅबिलिटी आदींची तपासणी करून मंडळांना मूर्ती नेण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे कार्यशाळेतून निघणाऱ्या प्रत्येक मोठ्या मूर्तीवर पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. (Mumbai Police)

श्री गणरायांचे आगमन येत्य १४ सप्टेंबर रोजी होत असून श्री गणेश चतुर्थीच्या सणाकरता विविध सार्वजनिक मंडळांच्यावतीने गणेश मूर्तींचे आगमन मंडपांमध्ये होत आहे. मंडपांमध्ये सजावटीची कामे करण्याच्यादृष्टीकोनातून विविध मंडळांच्यावतीने गणेश मूर्ती मंडपात नेल्या जात आहे. मागील शनिवारी व रविवारच्या दिवशी मंडळांच्यावतीने वाजत गाजत मूर्तींची आगमन मिरवणूक काढली जात आहे. भूलेश्वरच्या राजाची आगमन मिरवणुकीनंतर मंडपाजवळ गेल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाल्यानंतर याची गंभीर दखल घेण्यात आली आहे

या दुर्घटनेमुळे मूर्तींच्या उंचीवरील निर्बंधचा मुद्दा ऐरणीवर आला असून गणेश मूर्ती कार्यशाळेतून निघणाऱ्या मोठ्या मूर्तीबाबत विशेष काळजी आता पोलिसांकडून घेतली जाणार आहे. यामध्ये मूर्तीची फिटनेस ट्रॅबल आता तपासली जाणार आहे. यामध्ये मूर्ती तसेच त्यासाठी वापरण्यात येणारी ट्रॉली याची विशेष तपासणी केली जाणार आहे. या तपासणीमध्ये मूर्ती पूर्णपणे सुकलेली आहे का? ट्रॉलीची चाके व्यवस्थित आहेत का? मूर्ती वाहून नेण्यासाठी ते सक्षम आहे का? वाहन योग्य आहे का याची तपासणी करून कार्यशाळेतून मूर्ती आगमन मिरवणुकीसाठी मार्ग खुला करून दिला जाणार आहे. तसेच ट्रॉली वाहून नेणारे कार्यकर्ते, वाहन चालक आदींचीही माहिती जाणून घेत आगमन विसर्जनाचा मार्ग मोकळा केला जाणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >