- आदिवासी शाळांमधील गैरकारभारासाठी काँग्रेस नेतेच जबाबदार; राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मुद्यावर राजकारण थांबवावे
मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राला महाराष्ट्र भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांच्याकडून अभ्यासपूर्ण किंवा निष्पक्ष भूमिकेची अपेक्षा नसली, तरी महाराष्ट्रातील जनतेसमोर काही सत्य आकडेवारी आणि वास्तव मांडणे गरजेचे असल्याचे सांगत भाजपने काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. (Rahul Gandhi)
विद्यार्थ्यांच्या ज्या आंदोलनांचा संदर्भ राहुल गांधींनी पत्रात दिला आहे, त्या आदिवासी शाळा प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांकडूनच चालवल्या जात आहेत, असा दावा भाजपने केला आहे. काही दिवसांपूर्वी ज्या शाळेत तीन तरुणींचा सर्पदंशाने मृत्यू झाला, त्या शाळेचे संचालक माजी काँग्रेस खासदार मारोतराव कोवासे हे आहेत, तर त्यांचे सुपुत्र आणि गडचिरोली जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष विश्वजित कोवासे हे या शाळेचे सचिव आहेत, अशी माहिती भाजपने दिली. तसेच, यवतमाळमधील चिंधुजी लक्ष्मणराव पुरके आश्रम शाळेच्या तपासणीदरम्यान मुलींच्या स्वच्छतागृहांना दारेच नसल्याचे उघडकीस आले होते, आणि ही शाळा माजी मंत्री तथा काँग्रेस नेते वसंत पुरके यांच्या माध्यमातून चालवली जाते, असेही पत्रात म्हटले आहे. (BJP)
- दोन्ही राष्ट्रवादीत घडामोडींना वेग; २९ ऑगस्टच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष मुंबई : पार्थ पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात नुकत्याच झालेल्या ...
काँग्रेस सत्तेत असताना या शाळांवर चुकीच्या पद्धतीने ताबा मिळवून त्यांचा गैरवापर करण्यात आला, असा आरोप भाजप केला आहे. वर्षानुवर्षे आदिवासी समुदायाचे शोषण करणारेच लोक आता स्वतःला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समस्यांमागे लपण्याचा प्रयत्न करत आहेत. या काँग्रेस नेत्यांवर होणारी कारवाई रोखण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. (BJP VS Congress) आधी तेलंगणा आणि कर्नाटकात सुधारणा करा
आधी गैरप्रकार करायचे आणि नंतर त्यावर कारवाई झाल्यावर गोंधळ घालायचा, हा काँग्रेसचा ठरलेला पॅटर्न जनतेला आता चांगल्या प्रकारे समजला आहे. ही नौटंकी थांबवून काँग्रेस नेत्यांना पाठीशी घालणे बंद करावे, असे सांगत महाराष्ट्र सरकार आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांच्या रक्षणासाठी पूर्णपणे सक्षम असल्याचे भाजपने स्पष्ट केले. तसेच, राहुल गांधींनी महाराष्ट्रावर बोलण्याआधी स्वतःची सत्ता असलेल्या तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील आदिवासी कल्याण विभाग व वसतिगृहांची दुरवस्था सुधारण्याकडे लक्ष द्यावे, असा उपरोधिक सल्लाही देण्यात आला आहे. ( Maharashtra News)






