Nashik Road Safety : महाराष्ट्रात रस्ते अपघातांच्या संख्येत राज्याचा देशात तिसरा क्रमांक येतो. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने अपघात रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट (Zero Fatality District) कार्यक्रमांतर्गत नाशिक पोलीस मुख्यालयातील भीष्मराज सभागृहात विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अतिरिक्त पोलीस महासंचालक, वाहतूक महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यशाळेत सेव्ह लाईफ फाऊंडेशन (Save LIFE Foundation) च्या तज्ज्ञांनी पोलिसांना अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे प्रशिक्षण दिले. अपघातप्रवण मार्ग, ब्लॅक स्पॉट आणि जीवघेण्या अपघातांची कारणे शोधून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. मुळा-मुठा नदीच्या पात्रात तरंगताना झुडपांमध्ये ...
कार्यशाळेत विविध मुद्द्यावर चर्चा
दारू पिऊन वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालवणे, बेदरकार ड्रायव्हिंग, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे आणि महामार्गावर बेकायदेशीररीत्या अवजड वाहने पार्क करणे, अशा प्रकारांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, अपघातप्रवण मार्गांवर गस्त वाढवणे आणि अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार मिळतील, यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यावरही भर देण्यात आला.या कार्यशाळेत पोलिसांचे विविध गट तयार करून स्थानिक पातळीवरील इंजिनिअरिंग आणि अंमलबजावणीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि महामार्ग पोलिसांसह विविध विभागांचे ९० अधिकारी आणि २० कर्मचारी सहभागी झाले. याशिवाय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI),सार्वजनिक बांधकाम विभाग (Public Works Department), आरटीओ (RTO), नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नोडल अधिकारीही उपस्थित होते.
Nashik : भिवंडी येथे धोकादायक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) प्रशासन सतर्क झाले असून, शहरातील अतिधोकादायक वाडे आणि ...
वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे
अपघात कमी करण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नाही, तर प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवा, नियमांचे पालन करा आणि अपघातमुक्त नाशिकसाठी पोलिसांना सहकार्य करा असे आवाहन नाशिक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.






