Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. देवळा-मालेगाव रस्त्यावरील पिंपळगाव (वा.) जवळ अर्टिगा कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय.देविदास पांडुरंग ठाकरे (वय २६) आणि कैलास पुंडलिक देवरे (वय ५५, दोघे रा. धोबीघाट, दहिवड, ता. देवळा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
Nashik News : नाशिक शहरात एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह शिगेला असताना आणि मित्रांसोबत कार्यक्रमाची तयारी करताना एका तरुणावर ...
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारासहा अपघात झाला. शुक्रवारी सायंकाळी देविदास ठाकरे (Devidas Thackeray) आणि कैलास देवरे (Kailas Devare) हे दोघे मोटारसायकलने दहिवडकडून देवळ्याच्या दिशेने येत होते. त्याच वेळी देवळ्याकडून दहिवडच्या दिशेने जाणाऱ्या मारुती अर्टिगा कारने पिंपळगाव (वा.) येथील वळणावर त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील देविदास ठाकरे आणि कैलास देवरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर अर्टिगा कारच्या पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले. (Nashik Accident News)
Nashik : भिवंडी येथे धोकादायक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) प्रशासन सतर्क झाले असून, शहरातील अतिधोकादायक वाडे आणि ...
देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या दुर्दैवी घटनेमुळे दहिवड परिसरासह देवळा तालुक्यात शोककळा पसरली आहे. या अपघातप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात (Deola Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.






