नवी मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सोबत कधी काही होईल सांगता येत नाही. नवी मुंबई(Navi Mumbai) मध्ये एक धक्कादायक आणि हळहळ व्यक्त करणारी घटना घडली आहे. अवघ्या १७ वर्षांच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृत विद्यार्थ्याचं नाव शिव पाल(Shiv pal) असं असून तो पावना येथील रहिवासी होता.
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड उलथापालथ झाली आहे. ठाकरे गटाचे ...
नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडला आणि...
नवी मुंबईतील पावना परिसरात मृत शिव हा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. नेहमीप्रमाणे सकाळी तो नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-५ येथील विवेकानंद महाविद्यालयात आला होता. शिव पाल हा इयत्ता बारावीत(12th) शिकत होता. सकाळी साडेसातच्या सुमारास महाविद्यालयाच्या तळमजल्यावर त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. शिव पाल अचानक कोसळल्यामुळे गोंधळ उडाला. घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च ...
घटनेची माहिती शिव पाल याच्या घरी समजल्यावर त्याच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.






