चेंबूरच्या दुर्घटनेत १० विद्यार्थी जखमी, तर एकाचा मृत्यू
मुंबई : मुंबईच्या चेंबूर (Chembur) परिसरात मंगळवारी दुपारी शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची गंभीर घटना घडली. या अपघातात किमान १० विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. (Chembur News)
प्राथमिक माहितीनुसार, चेंबूरमधील ११ नंबर रोडवरून विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात असलेल्या एका खासगी शाळेच्या बसवर रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड अचानक कोसळले. झाडाच्या फांद्या बसच्या छतावर पडल्याने बसचे मोठे नुकसान झाले आणि बसमधील विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. (School Bus Accident)
- महालक्ष्मी आणि देवनार येथे पर्यायी सुविधा मुंबई (विशेष प्रतिनिधी) लहान पाळीव व भटके प्राणी जसे की मांजर, श्वान आदींचा मृत्यू झाल्यानंतर ...
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विहान श्रीवास्तव (११) असं मृत मुलाचे नाव आहे.
दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार एका विद्यार्थ्याच्या बसमध्ये अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर अग्निशमन दलाने झाडाच्या फांद्या कापून संपूर्ण बसची तपासणी सुरू केली. मात्र, या संदर्भात अधिकृत पुष्टी अद्याप प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय; डान्सबार प्रतिबंधक कायद्यातून पळवाटा शोधणाऱ्यांना दणका मुंबई : डान्सबार प्रतिबंधक कायद्यातून पळवाटा ...
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण आणि झाड कोसळण्यामागील परिस्थितीचा तपास सुरू आहे.






