Tuesday, June 30, 2026

Bollywood movies : जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाचा भडका ; 'अल्फा' ते 'धमाल 4'सह या 7 हिंदी चित्रपटांचा तडका

Bollywood movies : जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाचा भडका ; 'अल्फा' ते 'धमाल 4'सह या 7 हिंदी चित्रपटांचा तडका

Bollywood movies : तुम्ही चित्रपट प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. चित्रपटप्रेमींसाठी जुलै महिना मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. या महिन्यात अनेक हिंदी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहेत. अॅक्शन, कॉमेडी, थ्रिलर, सोशल ड्रामा आणि पौराणिक कथांवर आधारित चित्रपटांमुळे प्रेक्षकांना भरपूर मनोरंजनाची पर्वणी मिळणार आहे. जुलैमध्ये प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटांची यादी जाणून घेऊया.

'अल्फा' : वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील पहिला महिला-केंद्री चित्रपट 'अल्फा' (Alpha) हा यंदाच्या बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, शरवरी वाघ, बॉबी देओल आणि अनिल कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. शिव रावैल दिग्दर्शित हा चित्रपट ३ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

'धमाल ४' : लोकप्रिय 'धमाल' फ्रँचायझीचा चौथा भागही (Dhamaal 4) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजय देवगणसोबत अरशद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, रवि किशन, संजय मिश्रा, उपेंद्र लिमये, अंजली आनंद, संजीदा शेख आणि ईशा गुप्ता यांच्या भूमिका आहेत. इंद्र कुमार दिग्दर्शित हा चित्रपट १० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

'द इंडिया स्टोरी' : 'द इंडिया स्टोरी' (The India Story) हा सामाजिक आशय असलेला चित्रपट आहे. यात काजल अग्रवाल किचलू, श्रेयस तळपदे, त्रिशा सरदा, मुरली शर्मा, मनीष वाधवा, अतुल तिवारी, कमलेश सावंत आणि शाम मशिलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चेतन डी.के. दिग्दर्शित हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

'बेबी डू डाय डू' : भारतातील पहिला देसी हिटवुमन क्राइम-कॉमेडी थ्रिलर म्हणून ओळखला जाणारा 'बेबी डू डाय डू' (Baby Do Die Do) हा मानसशास्त्रीय थ्रिलर आहे. हुमा कुरेशी, सिकंदर खेर, चंकी पांडे आणि सीमा पाहवा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नचिकेत सामंत दिग्दर्शित हा चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी थिएटरमध्ये येणार आहे.

'इंद्रजाल' : पौराणिक कथांवर आधारित 'इंद्रजाल'चे चित्रीकरण घनदाट जंगल आणि गूढ गुहांमध्ये करण्यात आले आहे. महेश निकम, शनाया त्रिपाठी, यशराज डिंबळे आणि किरण माने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जगेश्वर ललिता ढोबळे दिग्दर्शित हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

'दुल्हनिया ले आएगी' : लग्नसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित हा कौटुंबिक चित्रपट आहे. खुशाली कुमार, महेश मांजरेकर आणि पियूष मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आकाश .आदित्य लामा दिग्दर्शित हा चित्रपट २४ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'तेरा यार हूँ मैं' : 'तेरा यार हूँ मैं' हा स्लाइस-ऑफ-लाईफ ड्रामा असून त्यात रोमँस आणि भावनिक कथानकाचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. मिलाप जावेरी दिग्दर्शित या चित्रपटात अमन इंद्र कुमार, आकांक्षा शर्मा, परेश रावल, जॉनी लीव्हर, सुप्रिया पिळगावकर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २४ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >