Jalgaon : सोमवारपासून महाराष्ट्रात वारीचा उत्साह पहायला मिळतोय. अनेक ठिकाणाहून सोमवारी पंढरपूरच्या दिशेने वारकरीमोठ्या भक्तिभावाने पायी निघाले आहे. अशातच भडगाव तालुक्यातून मन हेलावणारी घटना समोर आली आहे. भडगाव (Bhadgaon) तालुक्यातील कजगावजवळ सोमवारी मध्यरात्री भीषण रस्ता अपघात झाल्याची दुर्दैची घटना घडली. उभा अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिलांसह १५ जण जखमी झालेत. (Bhadgaon Accident News )
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; राज्यातील वीज दरांबाबत गैरसमज पसरविण्याचे काम सुरू मुंबई : राज्य सरकारचा महावितरणच्या खासगीकरणाचा ...
नेमकं काय घडलं ?
महिंदळे येथून बेलदारवाडीत पंढरपूर वारीसाठी निघालेल्या नातेवाईकांना सोडून आपल्या गावाकडे परतत असलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला सोमवारी भरधाव मालवाहू आयशर वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात दिनकर शेनफडू भदाणे यांचा मृत्यू झाला आहे. धडकेची तीव्रता एवढी होती की ट्रॅक्टरची ट्रॉली तुटून रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. या दुर्घटनेमुळे वारीच्या उत्साहावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
- बनावट ग्राहक पाठवून पोलिसांची कारवाई मुंबई : मुंबई पोलिसांनी गिरगाव परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकत कथित हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला ...
अपघातावेळी ट्रॅक्टरमध्ये एकूण १७ जण प्रवास करत होते. त्यामध्ये १५ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. सर्वजण महिंदळे येथून नातेवाईकांना वारीसाठी बेलदारवाडी येथे सोडून आपल्या गावाकडे परतत होते. कजगाव परिसरात भरधाव वेगाने आलेल्या मालवाहू आयशर वाहनाने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Bhadgaon Accident News )
मुंबई : उबाठा गटाचे उपनेते आणि आमदार सचिन अहिर यांनी महायुतीकडून (शिवसेना) विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी ...
दोघांची प्रकृती चिंताजनक
आयशर वाहनाच्या जोरदार धडकेमुळे ट्रॅक्टरची ट्रॉली अक्षरशः तुटून रस्त्याच्या कडेला फेकली गेली. अपघातानंतर परिसरात मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून जखमींना ट्रॉलीतून बाहेर काढले. काही वेळातच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सर्व जखमींना चाळीसगाव (Chalisgaon) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे. इतर जखमींनाही मार लागल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. (Bhadgaon Accident News )
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड उलथापालथ झाली आहे. ठाकरे गटाचे ...
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आणि काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. आयशर वाहनाचा वेग, चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा अन्य कोणते कारण अपघाताला कारणीभूत ठरले, याचा पोलीस तपास करीत आहेत. संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.






