मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावर बनावट सोन्याची बिस्किटं विक्री सुरू असल्याची माहिती महसूल गुप्तवार्ता संचालनालय अर्थात डीआरआय यांना समजली. (Operation Boolean Bust) मोहीम राबवून डीआरआयने आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई : “रायगडावर पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध ...
९ जणांना अटक डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबई विमानतळावरून(Mumbai Airport) सुरू असलेल्या या धंद्यावर पाळत ठेवली होती. तब्बल ३६ तास चाललेल्या या सलग कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी केवळ सोन्याची तस्करी करणाऱ्यांनाच पकडले नाही, तर आंतरराष्ट्रीय प्रवासी, विमानतळ कर्मचारी, हँडलर, मध्यस्थ आणि सोने वितळवणारे यांच्यातील संपूर्ण साखळीचा पर्दाफाश केला. या थरारक कारवाईत एका विमानतळ कर्मचाऱ्यासह एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात नुकत्याच झालेल्या शांतता करारानंतर निर्माण झालेली शांतता फार काळ टिकली नाही. होर्मुझच्या सामुद्रधुनीत ...
९ कोटीचे सोने जप्त परदेशातून तस्करी करून आणलेले सोने या केंद्रात आणले जायचे. तिथे ते वितळवून त्याचे सोन्याच्या अधिकृत बिस्किटांमध्ये रूपांतर केले जात होते आणि त्यानंतर ते बाजारात विकले जायचे. या कारवाईदरम्यान डीआरआयने सुमारे ५.९८ किलो परदेशी बनावटीचे सोने जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत जवळपास ८.९५ कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे.






