Monday, June 22, 2026

Jalgaon Vidhan Parishad Election : जळगावात महायुतीचे नंदकिशोर महाजन मोठ्या मताधिक्याने विजयी; विरोधी उमेदवाराला केवळ इतकी मतं

Jalgaon Vidhan Parishad Election : जळगावात महायुतीचे नंदकिशोर महाजन मोठ्या मताधिक्याने विजयी; विरोधी उमेदवाराला केवळ इतकी मतं

Jalgaon Vidhan Parishad Election : आज राज्यात विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्वाचेच लक्ष लागून होते. पूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधान परिषदेच्या ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने १० जागांवर एकतर्फी विजय मिळवत आपला वरचष्मा सिद्ध केला आहे. नाशिकच्या (Nashik) एका जागेचा अपवाद वगळता नागपूर, जळगाव, भंडारा-गोंदिया, नांदेड, सांगली-सातारा, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या सर्वच प्रमुख जागांवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. आधीच ६ जागा बिनविरोध खिशात टाकणाऱ्या महायुतीने आजच्या निकालांसह एकूण १७ पैकी १६ जागांवर कब्जा केला आहे.

जळगावमध्ये महायुतीने गड राखला

संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या जळगावकडे सर्वाचेच लागून होते. दरम्यान जळगावमध्ये (Jalgaon) महायुतीने दणदणीत विजय मिळवत आपला गड कायम राखला आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीतील (Jalgaon Vidhan Parishad Election) महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन (Nandkishore Mahajan) यांचा 582 मतांनी असा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यामुळे जळगावमध्ये महायुतीकडून मोठा जल्लोष होत असल्याचे पहायला मिळत आहे.

विरोधी उमेदवाराला केवळ इतकी मतं

जळगाव विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे (Sharad Tayade) यांना फक्त 17 मतं मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी (Anil Chaudhary) यांना 11 तर शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर रेश्मा काळे (Reshma Kale) यांना फक्त 1 मत मिळाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मविआसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

14 मतदारांचा मतदानावर बहिष्कार

जळगाव विधान परिषद निवडणुकीत एकूण 630 मतदार होते. त्यापैकी 14 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. निवडणुक्तीत पाच मतं अवैध ठरले तर 611 मतं वैध ठरले होतं. त्यापैकी 582 मतं नंदकिशोर महाजन यांना मिळाली आहेत. एकूण मतदानापैकी 97 टक्के मतं एकट्या महायुतीच्या उमेदवाराला मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीचे देखील 90 हून अधिक मतं ही महायुतीच्या नंदकिशोर महाजन यांना मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, जळगावमध्ये शिंदे गटाने भाजपच्या उमेदवारीसाठी पूर्ण ताकदीनिशी काम केल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महायुतीने विजय मिळवला. तब्बल वीस वर्षांच्या पक्षनिष्ठेची पावती म्हणून पक्षाने ही उमेदवारी दिल्याची भावना नंदकिशोर महाजन यांनी व्यक्त केली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >