रायगड : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामोते येथील डिस्कव्हरी रिसॉर्टमध्ये लग्न समारंभांच्या बुकिंगच्या रकमेत अपहार केल्याप्रकरणी सेल्स मॅनेजरविरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल 51 लाख 75 हजार रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी नाशिक येथील रहिवासी असून तो धामोते येथील डिस्कव्हरी रिसॉर्टमध्ये सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता. रिसॉर्टमध्ये आयोजित होणाऱ्या लग्न समारंभांच्या बुकिंगची रक्कम ग्राहकांकडून स्वीकारून ती रिसॉर्टच्या बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.
नाशिक : निष्काम कर्मयोगी,शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या परंपरेनुसार उत्तराधिकारी अनंत विभूषित श्रीमद जगदगुरु स्वामी ...
मात्र, आरोपीने ग्राहकांना बुकिंगच्या रकमेत सवलत देण्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर काही ग्राहकांकडून बुकिंगची रक्कम रिसॉर्टच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या बँक खात्यात तसेच रोख स्वरूपात स्वीकारल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. तक्रारीनुसार, एका ग्राहकाकडून 8 लाख रुपये रोख, दुसऱ्या ग्राहकाकडून 15 लाख रुपये, तिसऱ्या ग्राहकाकडून 15 लाख 50 हजार रुपये आणि चौथ्या ग्राहकाकडून 11 लाख 25 हजार रुपये बँक खात्यात तसेच 2 लाख रुपये रोख स्वीकारण्यात आले. अशा प्रकारे एकूण 51 लाख 75 हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रत्नागिरी : केळवली फाटा (ता. राजापूर) येथील जामदे पुलाजवळ एसटी बसने स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिल्याने अपघातात तिघे जखमी झाले.अपघातानंतर मोटार ...




