रत्नागिरी : केळवली फाटा (ता. राजापूर) येथील जामदे पुलाजवळ एसटी बसने स्विफ्ट डिझायर कारला जोरदार धडक दिल्याने अपघातात तिघे जखमी झाले.अपघातानंतर मोटार काही अंतरापर्यंत फरपटत गेली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोटारचालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कारचालक अमित रमेश साटम (रा. शिरगाव, ता. देवगड) आपल्या मित्रांसह आपल्या गावाहून मोटारीने (क्र. एमएच ०७ बीजी ९०९७) केळवली-पाचल मार्गे अणुस्कुराच्या दिशेने पुण्याकडे जात होते. त्यावेळी वैभववाडीच्या दिशेने येणारी कणकवली आगाराची भुईबावडा-रिंगेवाडी-खारेपाटण एसटी बस (क्र. एमएच २० बीएल ३०७९) केळवली फाट्यावरील जामदे पुलाजवळ आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वळणाच्या रस्त्यावर एसटी बसची मोटारीला धडक बसली. चालक गणपती भाऊसाहेब जाधव (वय ४७) यांच्या ताब्यातील एसटी बसने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार बससोबत काही अंतर फरपटत गेली.
देहरादून : उत्तराखंडमध्ये मान्सूनच्या आव्हानात्मक परिस्थिती असूनही चारधाम यात्रा सुरू आहे. यात्रेच्या 125 दिवसांत 48 लाखांहून अधिक भाविकांनी ...





