Nashik Vidhan Parishad Election :नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. १८) सकाळी ८ वाजेपासून जिल्ह्यातील ९ मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली असून ६१९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही आणि वेबकास्टिंगद्वारे संपूर्ण प्रक्रियेवर नजर ठेवली जाणार आहे.
Nashik Water Crisis : नाशिककरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पाण्यासंदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे. यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची ...
निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (शिवसेना शिंदे गट) यांच्याबरोबरच मतपत्रिकेवर गोकुळ गिते (भाजप बंडखोर /अपक्ष) आणि प्रसाद हिरे (भाजप बंडखोर) यांची नावे राहणार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने (ठाकरे गट) अधिकृत उमेदवार उभा न केल्यामुळे ही लढत प्रामुख्याने महायुती (Mahayuti) अंतर्गत आणि बंडखोरांभोवती फिरत राहिली आहे.
भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे (Prasad Hire) यांनी माघार घेतली आहे, तसेच अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनीही वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर आपला प्रचार थांबवून महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, कायदेशीर मुदतीनंतर या घडामोडी घडल्यामुळे होणाऱ्या मतदानाच्या मतपत्रिकेवर गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांची नावे कायम असणार आहेत. यामुळे पसंतीक्रमाची मते फुटण्याची धास्ती महायुतीला सतावत आहे.
- २० जूनला खात्यात येणार २,००० रुपये मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार ...
मविआची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका
दुसरीकडे, महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवला नसला, तरी महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आणि बंडखोरांच्या नावांचा मतपत्रिकेवरीलप्रभाव लक्षात घेता ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. महायुतीमधील नाराज मतदारांच्या मतांचा कौल आपल्या बाजूने कसा वळवता येईल, यासाठी मविआच्या नेत्यांनी पडद्यामागे रणनीती आखल्याचे बोलले जाते. महायुती आपले संख्याबळ टिकवून नरेंद्र दराडेंना विजयी करणार की मतपत्रिकेवरील बंडखोरांची नावे आणि गुप्त मतदानाची पद्धत नवा ट्रिस्ट आणणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
मुंबई : जून (June) महिन्याचा अर्धा टप्पा संपत आला असला तरी महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून (Monsoon) अद्याप पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक ...
जिल्ह्यातील मतदान केंद्र
१. नाशिक तहसील कार्यालय : नाशिक महानगर पालिका सदस्य (१२२), भगूर नगर परिषद सदस्य (२३) देवळाली छावणी परिषद (१).
२. दिंडोरी तहसील कार्यालय : दिंडोरी नगर पंचायत सदस्य (१९), पेठ नगर पंचायत सदस्य (१८).
३. इगतपुरी तहसील कार्यालय : इगतपुरी नगर परिषद सदस्य (२४), त्र्यंबकेश्वर नगर परिषद सदस्य (२३).
४. निफाड तहसील कार्यालय : निफाड नगर पंचायत सदस्य (१९), पिंपळगांव बसवंत नगर परिषद (२९), ओझर नगर परिषद (३१), सिन्नर नगर परिषद सदस्य (३४).
५. येवला तहसीलदार कार्यालय : येवला नगर परिषद सदस्य (३०), नांदगाव नगर परिषद सदस्य (२३), मनमाड नगर परिषद सदस्य (३५).
६. मालेगाव तहसीलदार कक्ष : मालेगाव महानगर पालिका सदस्य (८४).
७. चांदवड तहसीलदार कक्ष : चांदवड नगर परिषद पंचायत सदस्य (२३), देवळा नगर पंचायत सदस्य (१८).
८. कळवण तहसीलदार कक्ष : कळवण नगर पंचायत सदस्य (१९), सुरगाणा नगर पंचायत सदस्य (१९),
९. बागलाण तहसीलदार कक्ष : बागलाण सटाणा नगर परिषद सदस्य (२८)






