- २० जूनला खात्यात येणार २,००० रुपये
मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार २० जून रोजी योजनेचा २३ वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. मात्र, काही आवश्यक अटी पूर्ण न केल्यास अनेक शेतकऱ्यांचा २,००० रुपयांचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे. देशभरातील कोट्यवधी शेतकरी या हप्त्याची वाट पाहत असताना, आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली आहे का, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. (PM Kisan Yojana)
या ३ कारणांमुळे अडकू शकतो हप्ता :
1. ई-केवायसी (e-KYC) पूर्ण नसणे
मुंबई : देशातील तरुण आणि होतकरू पदवीधरांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक अतिशय सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. आरबीआयने आपल्या बहुचर्चित 'यंग ...
2. जमीन पडताळणी (Land Seeding) अपूर्ण असणे :
शेतकऱ्यांच्या कृषी जमिनीची माहिती अर्जाशी लिंक असणे आवश्यक आहे. लाभार्थी स्टेटसमध्ये 'Land Seeding' समोर 'No' दिसत असल्यास हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते. (PM Kisan Yojana)
3. बँक खाते आधारशी लिंक नसणे :
सरकार DBT (Direct Benefit Transfer) द्वारे थेट बँक खात्यात पैसे जमा करते. त्यामुळे बँक खाते आधारशी लिंक असणे आणि DBT सेवा सक्रिय असणे आवश्यक आहे. (PM Kisan Yojana)
२३ वा हप्ता मिळणार की नाही? असे करा स्टेटस चेक :
- पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. - होमपेजवरील 'Farmers Corner' विभागात जा. - 'Know Your Status' या पर्यायावर क्लिक करा. - तुमचा नोंदणी (Registration) क्रमांक टाका. - कॅप्चा भरून 'Get Data' किंवा 'Get OTP' वर क्लिक करा. - मोबाईलवर आलेला OTP टाकल्यानंतर तुमचे लाभार्थी स्टेटस स्क्रीनवर दिसेल. (PM Kisan Yojana)
यानंतर e-KYC, Eligibility आणि Land Seeding या तीनही पर्यायांसमोर 'Yes' दिसत असल्याची खात्री करा. तिन्ही ठिकाणी 'Yes' असल्यास २३ वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता निश्चित आहे. (PM Kisan Yojana)
अमेरिका आणि इराण यांच्यातील दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इराणचे ...
समस्या असल्यास कुठे संपर्क कराल?
२० जूनला खात्यात येणार २,००० रुपये :
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत २२ हप्ते वितरित करण्यात आले असून, आता २३ वा हप्ता २० जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे हप्ता वेळेवर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित ई-केवायसी, जमीन पडताळणी आणि बँक खाते तपासून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. (PM Kisan Yojana)





