उपमुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला आणि केली पाहणी
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील आर.सी. पाटील पुलाजवळ (R.C. Patil Bridge)गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात (Accident) दुचाकीवरील एका महिलेचा जागीच मृत्यू (Death) झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Mumbai Nashik Highway Accident)
Mumbai Crime : मुंबईत ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 12 रिक्षांसह दोन आरोपी अटकेत
मुंबई : खेरवाडी पोलीस ठाण्याच्या (Kherwadi Police ) गुन्हे प्रकटीकरण पथकाने ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. ...
प्राथमिक माहितीनुसार, एक दाम्पत्य दुचाकीवरून भिवंडीहून ठाण्याकडे जात असताना त्यांच्या वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली.
धडकेनंतर दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकी चालक जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Road Accident)
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमीला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी भिवंडी (Bhiwandi) येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ताफा याच मार्गावरून जात असताना त्यांनी अपघातस्थळी थांबून परिस्थितीची माहिती घेतली. जखमीला त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्याचे सांगण्यात आले.
Nashik : 'त्या' सुटकेसमधील बेवारस मृतदेहाची ओळख पटली, पतीनेच खून केल्याचा संशय
Nashik Crime News : नाशिक शहरातील तपोवन परिसरातील केवडीबन येथे मंगळवारी एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, आढळलेल्या महिलेच्या ...
अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करत घटनास्थळाचा पंचनामा केला. मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून ट्रक चालकाची चौकशी करण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Police)