Tuesday, August 18, 2026

Philippines News : धक्कादायक! फिलीपिन्समधील शाळेत गोळीबार; 2 जण जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Philippines News : धक्कादायक! फिलीपिन्समधील शाळेत गोळीबार; 2 जण जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

फिलीपिन्स : फिलीपिन्समध्ये शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण फिलीपिन्समधील झांबोआंगा शहरातील एका हायस्कूलमध्ये मंगळवारी हा प्रकार घडला. या घटनेत किमान 2 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर शाळेच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Philippines News)

प्रादेशिक पोलीस प्रवक्त्या मेजर शेलामी चँग यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शाळेचा परिसर सुरक्षित करण्यासाठी कारवाई सुरू केली. मात्र, घटनेनंतर लगेचच अधिक तपशील देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांकडून परिसराची तपासणी आणि घटनेशी संबंधित व्यक्तींची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. (Gun Firing)

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अतेनेओ दे झांबोआंगा विद्यापीठाच्या परिसरात घडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हा सातवी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. (Shooting)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वर्गातच विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत सध्या अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयित विद्यार्थ्याने शस्त्र शाळेत कसे आणले आणि त्याच्याकडे ते कसे आले, याचाही तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर शाळा परिसरातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर घटनेबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. (Internationl News)

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >