Nashik Crime News : नाशिक शहरातील तपोवन परिसरातील केवडीबन येथे मंगळवारी एका सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, आढळलेल्या महिलेच्या बेवारस मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मृतदेह हा एका महिलेचा असून तिच्या पतीनेच तिचा खून केल्याचा संशय प्राथमिक तपासातून व्यक्त होत आहे.
मृत महिला उपनगर भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत असून या घटनेनंतर फरार झालेल्या संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. बुधवारी ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
Nashik Accident News : नाशिक शहरातील पंचवटी याठिकाणी भीषण अपघाताची घटना घडली आहे. पंचवटी परिसरात स्वामीनारायण पोलीस चौकीसमोरील महामार्गावर भरधाव लक्झरी बसने ...
नेमकं काय घडलं ?
मंगळवारी (दि. १६) सकाळी केवडीबन परिसरात एका सुटकेसमध्ये अत्यंत निर्दयी पद्धतीने ठेवलेला महिलेचा बेवारस मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर देत, शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधून नुकत्याच बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती गोळा करून तपासास सुरुवात केली.
घटनास्थळ आणि परिसरातील मोबाईल टॉवर लोकेशनवरून पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले. तसेच परिसरातील तब्बल २८ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येतत असून, संशयित वाहनांचा माग काढण्याचे कामही पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.
- १४ जुलैला होणार ऐतिहासिक प्रक्षेपण नवी दिल्ली : भारतीय वंशाचे चिकित्सक आणि नासाचे अंतराळवीर अनिल मेनन (Anil Menon) आता आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेसाठी ...
पतीनेच खून केल्याचा दाट संशय
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा घरगुती कारणातून किंवा अज्ञात वादातून तिच्या पतीनेच खून केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. खुनानंतर पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पतीने मृतदेह गोणीत गुंडाळून एका सुटकेसमध्ये कोंडला आणि ती सुटकेस तपोवनच्या निर्जन भागात फेकून तो फरार झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी उपनगर आणि तपोवन परिसरात तपासाची चक्रे फिरविली असून, संशयित मारेकऱ्याला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. संशयितास अटक केल्यानंतरच या खुनाचे कारण उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले.






