Monday, June 15, 2026

Cruise Missile : लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Cruise Missile : लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज, 15 जून 2026 रोजी ओदिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची (LRLACM - Long Range Land Attack Cruise Missile) यशस्वी चाचणी घेतली. चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी श्रेणीद्वारे (ITR - Integrated Test Range) तैनात केलेल्या विविध ट्रॅकिंग उपकरणांनी संकलित केलेल्या माहितीनुसार, या चाचणीअंतर्गत समोर ठेवलेली सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या साध्य केली गेली.

हे लांब पल्ल्याचे जमिनीवर मारा करणारे क्रूझ क्षेपणास्त्र संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या सर्व उपप्रणाल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या विविध प्रयोगशाळा आणि या उद्योग क्षेत्रातील भारतीय भागीदारांनी विकसित केल्या आहेत. बंगळुरू इथल्या एरोनॉटिकल विकास संस्था (ADE - Aeronautical Development Establishment) ही या उपक्रमासाठीची मुख्य समन्वयक प्रयोगशाळा आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे वरिष्ठ अधिकारी आणि भारतीय नौदल तसेच या क्षेपणास्त्र वापरात आणणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हे प्रक्षेपण पार पडले.

लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करणाऱ्या या क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे पथक तसेच या उद्योगक्षेत्रातल्या भागीदारांचे अभिनंदन केले आहे. संरक्षण सचिव आणि संरक्षण (संशोधन आणि विकास) विभाग सचिव तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष राजेश कुमार सिंह यांनी या प्रक्षेपणादरम्यानच्या सर्व घडामोडींवर देखरेख ठेवली. या यशस्वी चाचणीमध्ये सहभागी असलेल्या पथकातील सर्व सदस्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा