नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना आगामी काळातील भारताच्या विकासाचा रोडमॅप मांडला. सेमीकंडक्टर, अणुऊर्जा, इंधन, सौरऊर्जा आणि आत्मनिर्भरता या क्षेत्रांवर भर देत पुढील काही वर्षांत देशाची क्षमता आणखी वाढवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. (Narendra Modi)
पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले की, या शतकातील २५ वर्षे पूर्ण झाली असून आता पुढील २५ वर्षे भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. देशाची दिशा निश्चित झाली असून आता गती थांबवता येणार नाही. गेल्या पाच-सात दशकांत जे साध्य झाले नाही, ते पुढील पाच-सात वर्षांत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी कार्यसंस्कृती, विचार करण्याची पद्धत आणि कामाचा वेग बदलण्याचे आवाहन त्यांनी केले.
५ ते ७ नवीन सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार :
डिजिटल युगात सेमीकंडक्टर चिपचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी भारताला या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यावर भर दिला. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांपासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्रासाठी चिप अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. देशात सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरू झाला असून तेथील उत्पादनाची निर्यातही सुरू झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. येत्या सात-आठ वर्षांत देशभरात आणखी पाच ते सात सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करण्याचे लक्ष्य त्यांनी जाहीर केले.
नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. ...
२०४७ पर्यंत १०० GW अणुऊर्जेचे लक्ष्य :
कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर आणि सेमीकंडक्टर उद्योगाच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात विजेची गरज भासणार आहे. त्यामुळे ऊर्जा सुरक्षा ही भारतासाठी काळाची गरज असल्याचे मोदी यांनी सांगितले. अणुऊर्जा हा ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत असून २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील दशकात पाच नवीन अणुभट्ट्या सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Narendra Modi)
तेल उत्खननासाठी समुद्रातील ९९ टक्के क्षेत्र खुले :
कच्च्या तेलासाठी परदेशांवर असलेले अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेनेही भारताने पावले उचलल्याचे मोदी म्हणाले. समुद्रातील मोठ्या भागाला यापूर्वी ‘नो-गो एरिया’ घोषित करण्यात आले होते. मात्र, आता समुद्रातील ९९ टक्के क्षेत्र तेल आणि वायू उत्खननासाठी खुले करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी ‘समुद्र मंथन’ योजनेचा उल्लेख करत देशातील ऊर्जा स्रोतांचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Narendra Modi)
सौरऊर्जेची क्षमता २ वरून १६० GW :
२०१४ पूर्वी देशातील केवळ ७० शहरांमध्ये पाइपद्वारे गॅसची सुविधा होती. गेल्या १२ वर्षांत ही सुविधा सुमारे ७०० शहरांपर्यंत पोहोचल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. सौरऊर्जेच्या क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, देशाची सौरऊर्जा क्षमता पूर्वी केवळ २ गिगावॅट होती, ती आता १६० गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे. सौरऊर्जेचा लाभ घराघरापर्यंत पोहोचवण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. (Narendra Modi)
नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात ...
रेल्वे विद्युतीकरणात मोठी झेप :
देशातील रेल्वे विद्युतीकरणाच्या प्रगतीचाही पंतप्रधान मोदी यांनी उल्लेख केला. दीर्घ काळात रेल्वे विद्युतीकरणाचा वेग कमी होता; मात्र गेल्या दशकात मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे डिझेलवरील खर्च आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत झाली असून पर्यावरणालाही फायदा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने हायड्रोजनवर चालणारी ट्रेनही सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. (Narendra Modi)
‘आत्मनिर्भर भारतामुळे संकटांचा सामना शक्य :
कोरोना महामारी, युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताच्या धोरणाचे महत्त्व अधोरेखित केले. कोरोनाच्या काळात लस, इंधन, खते आणि इतर आवश्यक वस्तूंच्या उपलब्धतेबाबत अनेक चिंता व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, भारताने पूर्वतयारी आणि देशांतर्गत क्षमता वाढवल्यामुळे या संकटांचा सामना करता आला, असा दावा मोदी यांनी केला. (Narendra Modi)
युरियाच्या किमतीचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, जगातील अनेक ठिकाणी युरियाची एक गोणी सुमारे ३ हजार रुपयांना मिळते, तर भारतातील शेतकऱ्यांना ती सुमारे ३०० रुपयांत उपलब्ध करून दिली जाते.
‘आता जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांचा डंका वाजवा’ :
व्यापारी करारांमुळे भारतासाठी मोठ्या संधी निर्माण झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. विशेषतः लघू आणि मध्यम उद्योगांना या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. “भारतीय उत्पादने जगाच्या बाजारपेठेत पोहोचली पाहिजेत,” असे सांगताना जागतिक दर्जाच्या निकषांचे पालन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जगातील इतर देशांच्या तुलनेत दर्जेदार आणि स्पर्धात्मक किमतीतील उत्पादने तयार करून भारताने जागतिक बाजारपेठेत आपली ओळख अधिक मजबूत करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. (Narendra Modi)
पुढील काही दशकांसाठी भारताची दिशा स्पष्ट असून आत्मनिर्भर, ऊर्जासुरक्षित, तंत्रज्ञानसक्षम आणि जागतिक बाजारपेठेत प्रभावी भारत घडवण्याचा संकल्प या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून पंतप्रधानांनी मांडला. (Narendra Modi)
View this post on Instagram




