पणजी : भारताची नवीकरणीय ऊर्जा परिसंस्था बळकट करण्याच्या आणि देशाच्या स्वच्छ ऊर्जेकडे होणाऱ्या संक्रमणाला गती देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज गोव्यात आयोजित 'ग्लोबल विंड डे कॉन्फरन्स 2026' मध्ये 'डब्ल्यूटी-मारुत' (विंड टर्बाइन मटेरियल्स अँड रिसोर्सेस युटिलिटी ट्रॅकर) या भारतातील पहिल्या वहिल्या 'पवन ऊर्जा टर्बाइन साहित्य पुरवठा साखळी व्यवस्थापनासाठी समर्पित पोर्टल'चा आरंभ केला. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद येस्सो नाईक; गोवा सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागाचे मंत्री सुदिन ढवळीकर; नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी; तसेच उत्पादक आणि प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Cruise Missile : लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली : डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आज, 15 जून 2026 रोजी ओदिशाच्या किनारपट्टीवर असलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून लांब ...
"पवन ऊर्जा: महत्त्वाकांक्षेपासून गतिमान प्रगतीकडे" (विंड एनर्जी: फ्रॉम अँबिशन टू अॅक्सलरेशन) या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या परिषदेत, ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यासाठी, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसेच पर्यावरणीय शाश्वततेचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी पवन ऊर्जा अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात आले. या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाल्याचे स्पष्ट करताना, पवनऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या उपकरणांचे उत्पादन आणि निर्यात यांमध्ये प्रमुख जागतिक केंद्र बनण्याची भारतामध्ये क्षमता आहे, यावर जोशी यांनी विशेष भर दिला. यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते 'विंड डीसीआर' पोर्टल, 'पवन ऊर्जा' या विषयावरील कॉफी टेबल बुक तसेच प्रमुख उद्योग आणि ज्ञान-भागीदारांनी तयार केलेले अनेक ज्ञान-विषयक आणि राज्यनिहाय धोरण अहवालांचेही प्रकाशन करण्यात आले.
FSSAI ची मोठी कारवाई! खाद्यपदार्थांच्या पॅकिंगमध्ये स्टेपल पिन, मेटल वायरला बंदी; नियम मोडल्यास दंडाची कारवाई
मुंबई : ग्राहकांच्या आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताचे स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील धोरणात्मक उद्दिष्ट आता लोकचळवळीत रुपांतरित झाले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी आपल्या विशेष भाषणात सांगितले. भारताच्या एकूण वीज निर्मिती क्षमतेपैकी निम्मी वीज आता बिगरजीवाश्म इंधन स्रोतांपासून तयार केली जात असल्यामुळे 2030 पर्यंत बिगर जीवाश्म स्रोतांपासून 500 गिगावॅट वीज निर्मितीचे तसेच 2070 पर्यंत 'नेट झिरो' (निव्वळ उत्सर्जन शून्यावर)चे उद्दीष्ट साध्य करण्याची भारताची वचनबद्धता आणखी पक्की झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
Madhya Pradesh : अफवा पसरली आणि रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली
मोरेना : मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यातील हेतमपूर - घेर विभागाजवळ अफवा पसरल्यामुळे रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली. घाबरलेल्या प्रवाशांनी ...
गोव्याचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी परिषदेला संबोधित करताना, गोव्यात पवन ऊर्जा विकासाचा विस्तार करण्याच्या संधी आणि क्षमतेवर प्रकाश टाकला तसेच नवीकरणीय ऊर्जा उपक्रमांना पाठिंबा देण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
NDA : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एनडीएच्या पहिल्या बॅचमध्ये १४ महिला अधिकारी सज्ज
देहरादून : सर्वोच्च न्यायालयाच्या २०२१ मधील ऐतिहासिक निर्णयामुळे नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये (एनडीए) महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. यानुसार, ...
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने (एमएनआरई) 'इंडियन विंड टर्बाइन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन' (आयडब्ल्यूटीएमए), 'विंड इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन' (डब्ल्यूआयपीपीए) आणि 'इंडियन विंड पॉवर असोसिएशन' (आयडब्ल्यूपीए) यांसारख्या पवन ऊर्जेच्या क्षेत्रातील प्रमुख संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या परिषदेत धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, विकासक, उत्पादक, वित्तीय संस्था, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि इतर संबंधित घटक सहभागी झाले होते.