Tuesday, June 9, 2026

IND VS IRE : आयर्लंड विरूद्धच्या मालिकेतून मोहम्मद सिराज बाहेर !

IND VS IRE : आयर्लंड विरूद्धच्या मालिकेतून मोहम्मद सिराज बाहेर !

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी मोठे बदल करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा आयर्लंड विरूद्धच्या मालिकेतून वगळले आहे. सिराजला विश्रांती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बीसीसीआयच्या निवड समितीने सांगितले. सिराजच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश केला आहे. भारताने अफगाणिस्तान विरूद्धची एकमेव कसोटी एक डाव आणि ३०० धावांनी जिंकली. या विजयानंतर टीम इंडिया आता अफगाणिस्तान विरोधात तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. अफगाणिस्तान विरूद्ध भारताच्या वन डे मालिकेची सुरुवात शनिवार १३ जून २०२६ पासून होणार आहे.अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघ आयर्लंड विरोधात दोन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे. नंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका होणार आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन वन डे सामन्यांची मालिका रंगणार आहे. (Sports)

वर्कलोड मॅनेजमेंटमुळे सिराजला विश्रांती

काही दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या भारतीय संघात आता बदल करण्यात आला आहे. वर्कलोड मॅनेजमेंट आणि दुखापतीचा धोका टाळण्यासाठी मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. बीसीसीआयने सांगीतले वैद्यकीय टीम आणि संघ व्यवस्थापनाच्या सल्ल्यानंतर सिराजला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिराजच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला मोठी संधी मिळाली आहे. इंग्लंड सारख्या एक्स्ट्रा बाऊन्स पिचवर प्रसिद्ध कृष्णाला चांगली मदत मिळू शकतो असे सांगितले जात आहे.

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार),तिलक वर्मा (उपकर्णधार),अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी आणि प्रसिद्ध कृष्णा.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >