इंग्लंड :लॉर्ड्स कसोटीत मिळालेल्या विजयाच्या आनंदा वेळी इंग्लंड संघाला मोठ धक्का बसला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स पुन्हा एकदा वादात सापडला आहे. कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन हे रात्री उशिरा एका नाईटक्लबमध्ये गेले होते. ते दोघे रात्रभर नाईटक्लबमध्ये होते, अशी माहिती समोर आल्यानंतर इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे. दोघांच्या विरुद्धात संघाच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला जात आहे. तर इंग्लंड बोर्डाने हा प्रकरण स्वतंत्र क्रिकेट नियामकाकडे सोपवला आहे.त्यामुळे आता या दोघांबाबत कोणता निर्णय घेतला जाईल याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष्य लागले आहे.
नाशिकमधील ‘टी.सी.एस्.’ मधील हिंदू महिलांच्या धर्मांतराविषयी चौकशी अहवाल सादर करा ! मुंबई - नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या बहुराष्ट्रीय ...
नेमकं नाईटक्लबमध्ये घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार,न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी संपल्यानंतर सोमवारी पहाटे बेन स्टोक्स आणि गस अॅटकिन्सन एका नाईटक्लबमध्ये होते.ते दोघेही रात्रभर क्लबमध्ये असल्याचे सांगीतले जात आहे. याच ठिकाणी कथित वादग्रस्त प्रकरण झाल्याचे समोर आले आहे. मात्र घटन्या बाबत अद्याप काही स्पष्टता सांगण्यात आली नाही आहे. संघाच्या कर्फ्यू नियमांचे किंवा नाईटक्लबच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास ECB कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.यामुळे आता क्रिकेट वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Sports)
घटनेचा परिणाम कसोटी मालिकेवर होणार ?
या प्रकरणाचा थेट परिणाम आगामी मालिकेवर होण्याची शक्यता आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने प्रकरणाची दखल घेत. दुसऱ्या कसोटी सामन्याचे संघाची घोषणा पुढे केली आहे.स्टोक्स आणि अॅटकिन्सन यांनी संघाच्या शिस्तभंगाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केले आहे का,याचा सध्या तपास सुरू आहे. जर चौकशीत स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सन दोषी मिळाले तर त्यांच्यावर बंदी घालण्यात येऊ शकते. याचा थेट परिणाम संघावर होईल. इंग्लंड क्रिकेटमध्ये मैदानाबाहेरील वादांची ही पहिली घटना नाही. गेल्या काही वर्षांत खेळाडूंच्या वर्तनामुळे बोर्डाला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला आहे. काही काळापूर्वीच अॅशेस मालिकेपूर्वी मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार हॅरी ब्रूक न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथे एका नाईटक्लबमध्ये वादात अडकला होता. त्यावेळी एका बाऊन्सरने त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. त्या वेळी जेकब बेथेल आणि जोश टंग हेही त्याच्यासोबत होते. या घटनेनंतर ECB ला खेळाडूंवर मध्यरात्रीनंतर बाहेर जाण्यासंबंधी कडक निर्बंध आणि कर्फ्यू लागू करावा लागला होता.
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमाचं खोटं नाटक करवून एका अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं. ...
स्टोक्स पुन्हा नाईटक्लब वादात ?
बेन स्टोक्ससाठी हा प्रकरण काही नवीन नाही आहे. याआधीही तो 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यानंतर ब्रिस्टलमधील एका नाईटक्लबबाहेर झालेल्या रस्त्यावरील भांडणप्रकरणी अडकला होता.त्यावेळी त्याला स्टोक्सला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.या घटनेमुळे त्याच्या करियरवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला होते. इंग्लंड क्रिकेटला ही मोठा अपमान सहन करावा लागला होता. आता पुन्हा एकदा नाईटक्लबशी संबंधित वादात त्याचे नाव समोर आल्याने इंग्लंड संघासह क्रिकेटविश्वातही चर्चा रंगल्या आहेत.






