काकामिगाहारा : भारतीय महिला अंडर-१८ हॉकी संघाने महिला १८-वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत शानदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात भारताने कोरियाचा ३-० अशा एकतर्फी फरकाने पराभव करून स्पर्धेची दमदार सांगता केली. उपांत्य फेरीत चीनविरुद्ध शूटआऊटमध्ये झालेल्या निसटत्या पराभवानंतर भारतीय संघाने पुनरागमन करत सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे दर्शन घडवले. सामन्याच्या अवघ्या दुसऱ्याच मिनिटाला संदीपा कुमारीने अप्रतिम गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. या जलद गोलमुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आणि त्यांनी सामन्यावर पकड मजबूत केली.
मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. भारत विरुद्ध ...
भारताने चेंडूवरील नियंत्रण कायम राखत कोरियन बचावफळीवर सातत्याने दबाव निर्माण केला. त्याचे फळ १६व्या मिनिटाला मिळाले. संघाची कर्णधार स्वीटी कुजूर हिने उत्कृष्ट फील्ड गोल करत भारताची आघाडी २-० अशी वाढवली. पहिल्या सत्राअखेर भारताने सामन्यावर संपूर्ण वर्चस्व मिळवले होते. दुसऱ्या हाफमध्येही भारतीय संघाचा आक्रमक खेळ कायम राहिला. ३३व्या मिनिटाला स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारी खेळाडू नौशीन नाझ हिने अचूक फील्ड गोल नोंदवत भारताची आघाडी ३-० अशी भक्कम केली. या गोलसह नौशीनच्या स्पर्धेतील गोलांची संख्या १२ वर पोहोचली आणि तिने अव्वल गोलकर्ती म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले.
मुंबई : अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली आहे.संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. आगामी वनडे मालिकेसाठी विराट कोहलीला ...
भारतीय बचावफळीनेही तितकीच प्रभावी कामगिरी करत कोरियाला एकही स्पष्ट संधी निर्माण करू दिली नाही. गोलरक्षक आणि बचावपटूंनी शिस्तबद्ध खेळ करत कोरियाला गोलपासून दूर ठेवले. परिणामी भारताने क्लीन शीट राखत ३-० असा शानदार विजय मिळवला. सामन्यातील प्रभावी खेळ आणि सुरुवातीचा महत्त्वपूर्ण गोल यासाठी संदीपा कुमारी हिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने आक्रमक आणि संतुलित खेळाचे दर्शन घडवले. भारताने स्पर्धेत तब्बल ३६ गोल झळकावत आपली आक्रमक क्षमता सिद्ध केली, तर बचावातही उल्लेखनीय सातत्य राखले. कांस्यपदकासह स्पर्धेची सांगता करताना भारतीय युवा खेळाडूंनी भविष्यातील भारतीय हॉकीसाठी आशादायी चित्र निर्माण केले आहे.




