मुंबई : अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली आहे.संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. आगामी वनडे मालिकेसाठी विराट कोहलीला संघातून बाहेर झाला आहे. आयपीएल २०२६ च्या फायनल सामन्यादरम्यान विराटला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, ज्यामुळे तो या मालिकेला मुकणार आहे असं सांगितले जात आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी ही माहिती दिली आहे. विराटच्या जागी युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला संघात स्थान देण्यात आले आहे. विराट कधीपर्यंत पुनरागमन करेल हे अद्याप स्पष्ट नाही,परंतु इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेपर्यंत तो फिट होईल अशी अपेक्षा असल्याचे आगरकर म्हणाले.
FIFA WORLD CUP 2026 : प्रतीक्षा आता संपली आहे! कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या देशांमध्ये ११ जूनपासून सुरू होणाऱ्या २०२६ फिफा विश्वचषकासाठी सज्ज व्हा. ४८ संघ, १०४ ...
संघ निवडीत मोठे बदल
बीसीसीआयने आगामी इंग्लंड, आयर्लंड आणि आशियाई स्पर्धेसाठीही संघाची घोषणा केली आहे.यात श्रेयस अय्यरकडे टी-२० संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे, तर सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात आले आहे. तिलक वर्माकडे टी-२० संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या फिटनेस चाचण्यांचे निष्कर्ष तपासून त्यांच्या निवडीबाबतचे निर्णय घेणार असल्याचे आगरकर यांनी सांगितले.अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका: मालिकेतील पहिला सामना १३ जून रोजी धरमशाला येथे होणार आहे, तर त्यानंतरचे सामने लखनऊ आणि चेन्नईत खेळवले जाणार आहेत.
BCCI Press Conference | On India's squad for the three-match ODI series against Afghanistan, Indian Men's cricket team chief selector Ajit Agarkar says, "Yashasvi (Jaiswal) will be Virat Kohli's replacement." pic.twitter.com/enfBUkVaIj
— ANI (@ANI) June 6, 2026
अफगाणिस्तानविरुद्धचा भारतीय वनडे संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.





